T20 World Cup 2022: ऑस्ट्रेलियात येत्या आक्टोबर- नोव्हेबर महिन्यात रंगणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषकासाठी आयसीसीनं अंतिम 16 संघांची यादी जाहीर केलीय. या स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलिया (Australi), अफगाणिस्तान (Afghanistan), बांगलादेश (Banglades), इंग्लंड (England), भारत (India), नामिबिया (Namibia), न्यूझीलंड (New Zealand), पाकिस्तान (Pakistan), स्कॉटलंड (Scotland), दक्षिण आफ्रिका (South Africa), श्रीलंका (Sri Lanka), वेस्ट इंडिज (West Indies), आयर्लंड (Ireland) आणि यूएईनं (United Arab Emirates) आधीच आपलं स्थान निश्चित केलं होतं. त्यानंतर आता नेदरलँड्स आणि झिम्बाब्वे या दोन्ही संघांनी क्वालिफायर टूर्नामेंटच्या अंतिम फेरीत पोहोचून टी-20 विश्वचषकात 2022 मध्ये आपली जागा पक्की केलीय.


अमेरिका-पापुआ न्यू गिनी यांचं टी-20 विश्वचषक 2022 खेळण्याचं स्वप्न भंगलं
झिम्बाब्वेमध्ये खेळल्या गेलेल्या क्वालिफायर स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीत यजमानांनी पापुआ न्यू गिनीचा 27 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेनं 20 षटकांत पाच गडी गमावून 199 धावा केल्या. प्रत्युत्तरात पापुआ न्यू गिनीचा संघ 8 विकेट्सवर केवळ 172 धावाच करू शकला. दुसऱ्या उपांत्य फेरीत नेदरलँड्सनं युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाचा सात विकेट्सनं पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना अमेरिकेचा संघ 138 धावांत आटोपला. प्रत्युत्तरात नेदरलँड्सनं एक षटक शिल्लक ठेवून सामना जिंकला.


ट्वीट-



कधी कुठे रंगाणार आगामी टी-20 विश्वचषकातील सामने?
ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 मध्ये 16 ऑक्टोबरपासून 13 नोव्हेंबर पर्यंत एकूण 46 सामने खेळले जाणार आहेत. हे सर्व सामने ऑस्ट्रेलियाच्या सात शहरांमध्ये म्हणजेच अॅडलेड, ब्रिस्बेन, जिलॉन्ग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी येथे खेळले जाणार आहे. उपांत्य फेरीचे सामने 9 आणि 10 नोव्हेंबर रोजी सिडनी क्रिकेट मैदान आणि अॅडलेड येथे खेळवले जातील. तर, अंतिम सामना 13 नोव्हेंबरला मेलबर्नमध्ये खेळला जाईल. 


हे देखील वाचा-