Virat Kohli at Lords : इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारत 100 धावांनी पराभूत झाला. संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) पुन्हा एकदा फेल झाला. पण तरीदेखील कोहलीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. लॉर्ड्सच्या मैदानात फलंदाजीला येताना कोहलीच्या 'रॉयल वॉकचा' हा व्हिडीओ असून रोहित शर्मा बाद झाल्यानंतर फलंदाजीला कोहली मैदानात येत असताना हा व्हिडीओ शूट करण्यात आला.


या व्हिडीओत विराट कॉलर वर करत मैदानात येताना दिसत असून यातून विराट कोहलीचा फॉर्म चांगला असो किंवा खराब त्याचा स्वॅग दमदार असणार यात शंका नाही. या व्हिडीओला विविध म्युझिक लावून विराटचे फॅन्स व्हिडीओ शेअर करत आहेत. तर या व्हिडीओवर तुम्हीही एक नजर फिरवा...   






 


2019 पासून एकही शतक नाही


तब्बल 70 शतकं नावावर असलेल्या विराटला 2019 पासून एकही शतक ठोकता आलेलं नाही. नोव्हेंबर 2019 मध्ये बांग्लादेशविरुद्धच्या सामन्यात कोहलीने शतक ठोकलं होतं. ज्यानंतर कोहलीला गेल्या अडीच वर्षांत तिन्ही फॉरमेटमध्ये एकही शतक झळकावता आलं नाहीये. आयपीएलच्या पंधराव्या हंगामापूर्वी त्यानं विश्रांती घेतली. विशेष म्हणजे, आयपीएलमध्येही विराटला काही खास कामगिरी करता आली नाही. त्यानं आयपीएल 2022 मध्ये एकूण 16 सामन्यात फक्त 341 धावा केल्या. दरम्यान, टी-20 विश्वचषकाला काहीच महिने शिल्लक राहिले आहेत. यामुळं विराट कोहलीचं फॉर्ममध्ये येणं भारतीय संघासाठी खूप गरजेचं आहे. पण इंग्लंड दौऱ्यातही विराट अजिबात खास कामगिरी करु शकला नसल्याचं दिसून आलं आहे.


सामन्यातही भारत पराभूत


क्रिकेटची पंढरी म्हणून प्रसिद्ध लॉर्ड्स मैदानात पार पडलेल्या या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी घेतली. ज्यानंतर ज्यानंतर इंग्लंडची सुरुवात काहीशी चांगली झाली, बेअरस्टो (38) आणि रॉय (28) जोडीने अर्धशतकी भागिदारी केली. पण त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी एक-एक करत इंग्लंडला झटके देण्यास सुरुवात केली. पण अखेरच्या काही षटकांमध्ये मोईन अली आणि डेविड विली यांनी एक उत्तम भागिदारी रचत इंग्लंडचा डाव सावरला. यावेळी अलीने 47 तर विलीने 41 धावा करत 247 धावांचे आव्हान भारतासमोर ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या भारताला सुरुवातीपासून खास कामगिरी करता आली नाही. भारताते आघाडीचे फलंदाज अगदी स्वस्तात माघारी परतत होते. रोहित-पंत हे शून्यावर बाद झाले. शिखरही 9 तर कोहली 16 धावा करुन तंबूत परतला. सूर्यकुमारने डाव सावरण्याचा प्रयत्न केला पण तो 27 धावा करुन बाद झाला. नंतर जाडेजाने पांड्यासोबत खेळ सावरला पण दोघेही प्रत्येकी 29 धावा करुन बाद झाले. शमीनेही 23 धावा केल्या, पण नंतरचे गडी पटापट बाद झाले, 38.5 ओव्हलमध्ये भारत सर्वबाद झाला आणि सामना इंग्लंडने 100 धावांनी जिंकला. इंग्लंडचा गोलंदाज रीस टोपले याने सामन्यात उत्तम प्रदर्शन दाखवत भारताचे 6 गडी बाद केले त्याला सामनावीर म्हणन गौरवण्यात आले.  


हे देखील वाचा-