IPL Trade News 2026 : फ्रँचायझीचा शॉकिंग टर्न! 24 कोटींचा मेगा स्टार बाहेर, ऑक्शनपूर्वी KKR ची मोठी खेळी, सगळ्यांचं डोकं फिरलं
IPL 2026 Trade Window Update News Marathi : इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या मिनी लिलावात साधारणपणे संघ मोठे फेरबदल करत नाहीत.

KKR Release Venkatesh Iyer : इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या मिनी लिलावात साधारणपणे संघ मोठे फेरबदल करत नाहीत. टीम व्यवस्थापन मागील हंगामातील कमकुवत बाजू भरून काढण्यावर भर देते. त्यामुळे रिटेन्शन डेच्या दिवशी अनेक महागडे आणि मोठे नावं लिलावात दिसतील, अशी शक्यता कमी असते. सध्या पाहता, वेंकटेश अय्यर हेच असे एक मोठे नाव असू शकते, ज्याला रिलीज करण्यात येऊ शकते. याचदरम्यान सर्वांचे लक्ष आयपीएल इतिहासातील सर्वात मोठ्या ट्रेडकडे लागले आहे.
KKR कडून वेंकटेश अय्यरला रिलीज करण्याची शक्यता
कोलकाता नाईट रायडर्स वेंकटेश अय्यरला रिलीज करण्याचा विचार करत आहे. मेगा ऑक्शनमध्ये केकेआरने त्यांच्यासाठी तब्बल 23.75 कोटींची भलीमोठी बोली लावली होती. क्रिकबजच्या माहितीनुसार, केकेआर त्याला रिलीज करू शकते, पण मिनी ऑक्शनमध्ये त्याला कमी किमतीत पुन्हा खरेदी करण्याची योजना बनवली जात आहे. अय्यर 2021 पासून केकेआरसाठी खेळत आहे.
आयपीएल 2025 हंगामात वेंकटेश अय्यर फॉर्ममध्ये नव्हता. 11 सामन्यांत त्यांच्या बॅटमधून केवळ 142 धावा निघाल्या. चर्चा अशीही आहे की अय्यरसोबतच क्विंटन डी कॉक आणि एनरिक नॉर्टजे यांनाही केकेआर रिलीज करू शकते.
गौतम गंभीरसोबत काम करण्याबद्दल अय्यरला काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, "गंभीर आपल्या खेळाडूंमध्ये सर्वोत्तम प्रदर्शनाची अपेक्षा ठेवतो. एखादा खेळाडू सरासरी खेळ करत असेल, तर त्याच्यासाठी गंभीरच्या टीममध्ये टिकून राहणे कठीण जाते."
🚨 Cricbuzz Exclusive
— Cricbuzz (@cricbuzz) November 14, 2025
Venkatesh Iyer is likely to be released by KKR
There remains a possibility that the franchise may attempt to buy him back
He was bought for INR 23.75 crore in the previous auction#IPLAuction #IPL2026 pic.twitter.com/Oz9t2RBWEC
मेगा ऑक्शनच्या वेळी केकेआरने वेंकटेश अय्यरला कोणत्याही किंमतीत घेण्याचा निर्धार केला होता. LSG ने 7.75 कोटींपर्यंत बोली लावली होती, तर आरसीबीनेही 23.50 कोटींपर्यंत स्पर्धा केली होती; पण शेवटी केकेआरने सर्वांना मागे टाकत बोली जिंकली.
मागील हंगामात केकेआरची ऑक्शन रणनीती समजून घेणे अवघड झाले होते. संघाने श्रेयस अय्यरलाही रिलीज केले होते, त्यामुळे नवीन कॅप्टन कोण असेल यावर बरीच चर्चा रंगली. अखेर अजिंक्य रहाणे याच्यावर कप्तानीची जबाबदारी सोपवण्यात आली, जो तर पहिल्या ऑक्शन राऊंडमध्ये विक्रीसाठीही गेला नव्हता.
वेंकटेश अय्यरला रिलीज केल्यास केकेआरचा पर्स तब्बल 23.75 कोटींनी रिकामा होईल. त्यामुळे या वेळी KKR कडे कॅप्टन्सीपासून ते मिडल-ऑर्डरपर्यंत अनेक पर्याय खुले राहणार आहेत.
CSK कडून सर्वाधिक खेळाडू रिलीज होण्याची शक्यता
चेन्नई सुपर किंग्स या वेळी सर्वाधिक खेळाडूंना रिलीज करू शकते, अशी चर्चा आहे. यात डेवोन कॉनवे, राहुल त्रिपाठी, रचिन रविंद्र, दीपक हुड्डा, विजय शंकर आणि जेमी ओव्हर्टन यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. राजस्थान रॉयल्सदेखील मोठे बदल करू शकते. लुआन-ड्रे प्रीटोरियस, महेश तीक्ष्णा, फजलहक फारूकी आणि क्वेना मफाका या नावांवरही रिलीजचा शिक्का बसू शकतो. मागील हंगामातील विजेते रॉयल चॅलेंजर्स बंगलुरु आणि उपविजेते पंजाब किंग्स यांच्याकडून मोठ्या प्रमाणात रिलीज होण्याची शक्यता मात्र कमी आहे.
हे ही वाचा -





















