एक्स्प्लोर

IPL Black Magic : आयपीएलमध्ये काळी जादू, लिंबू अन् जादूटोणा? काय आहे प्रकरण? 

IPL CSK Vs SRH : सोशल मीडियामध्ये एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यामध्ये एक व्यक्ती लिंबूच्या माध्यमातून काहीतरी मंत्र म्हणताना दिसतोय. हा व्हिडीओ मजेशीर वाटत असला तरी त्यावरून आता चर्चा रंगली आहे. 

मुंबई : शनिवारी हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्स संघात सामना झाला. या सामन्यात हैदराबादच्या एका चाहत्यानं स्टँड्समध्ये लिंबू हातात घेऊन काही हावभाव केले. योगायोगानं त्याचवेळी चेन्नईचा फलंदाज शिवम दुबे बाद झाला आणि मैदानातल्या काळ्या जादूची चर्चा रंगली. काय आहे हे सगळं प्रकरण? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

हातात लिंबू...तोंडानं कोणत्यातरी मंत्रांचा जाप... आणि त्यानंतर पडलेली विकेट. सोशल मीडियाच्या माध्यमातून या संबंधित एक रील तुमच्या मोबाईल स्क्रीनवर नक्कीच आलं असेल. पण या रीलमुळे क्रिकेटच्या मैदानात काळ्या जादूची चर्चा चांगलीच रंगली.

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

हा व्हिडीओ आहे शनिवारी झालेल्या आयपीएल सामन्यातला. हैदराबाद विरूद्ध चेन्नई संघातला हा सामना राजीव गांधी स्टेडियमवर सुरू होता. याच दरम्यान चेन्नईची फलंदाजी सुरू असताना एकानं हा व्हिडीओ शूट केला. योगायोगाची बाब म्हणजे हातात लिंबू घेऊन हे असे उद्योग करताना नेमकी चेन्नईची विकेट पडली आणि या जादूची चर्चा सुरू झाली. 

हा व्हिडीओ सोशल मीडियात तुफान व्हायरल झाला आणि त्यानंतर काही फोटो शॉप मास्टरना त्यांची क्रिएटिव्हिटी दाखवण्याची हुक्की आली. एकानं सीएसकेचं लेटरहेड तयार केलं आणि त्यात संबंधित क्रिकेट फॅनवर कारवाई होणार असल्याचं म्हटलं.

पण खरं तर अशा कोणत्याही प्रकारची कारवाई सीएसएके किंवा बीसीसीआनं केलीच नाही. हे पत्र बनावट असल्याचं समोर आलं. मात्र त्यामुळे सोशल मीडियात मात्र मीम्स आणि त्याखाली कमेंट्सचा पाऊस पडला.

सामाजिक भान गरजेचं

खेळाडूंची मैदानातली कामगिरी... सामन्यातली हार-जीत हे सगळं खेळाडूंच्या कौशल्याचं आणि मेहनतीचं फळ असतं. मात्र अशा प्रकारच्या कृत्यातून त्याला जादूटोणा संबोधणं किंवा तशा चर्चांना वाव देणं पूर्णपणे चुकीचं आहे. 

सामना पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांनीही केवळ रीलसाठी आणि सोशल मीडियातल्या लाईक्स-कमेंटसाठी असे उद्योग करताना जरा सामाजिक भान ठेवणंही गरजेचं आहे.

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

Duleep Trophy Schedule : वैभव सूर्यवंशीच्या कारकिर्दीतील आणखी एक मोठा टप्पा! कधी अन् किती वाजता उतरणार मैदानात?, सर्व माहिती एका क्लिकवर
वैभव सूर्यवंशीच्या कारकिर्दीतील आणखी एक मोठा टप्पा! कधी अन् किती वाजता उतरणार मैदानात?, सर्व माहिती एका क्लिकवर
DY Patil Passed Away : पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
Ind vs SL Test Series : संघात जागा मिळाली, पण प्लेइंग XI मधून OUT? आकिब नबीचं नशीब पुन्हा आडवं, 3 खतरनाक गोलंदाजांमुळे गौतम गंभीरच्या प्रायोरिटी लिस्टमध्ये पण नाही
संघात जागा मिळाली, पण प्लेइंग XI मधून OUT? आकिब नबीचं नशीब पुन्हा आडवं, 3 खतरनाक गोलंदाजांमुळे गौतम गंभीरच्या प्रायोरिटी लिस्टमध्ये पण नाही
Auqib Nabi Profile : वडील डॉक्टर बनवू इच्छित होते, मित्राने बनवलं भारताचा स्टार; आकिब नबीची काळजाला भिडणारी कहाणी
वडील डॉक्टर बनवू इच्छित होते, मित्राने बनवलं भारताचा स्टार; आकिब नबीची काळजाला भिडणारी कहाणी

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Crime News : चारित्र्यावर संशय, नवऱ्यानं संतापात पत्नीच्या अंगावर दारू ओतली अन्....; जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हादरलं!
चारित्र्यावर संशय, नवऱ्यानं संतापात पत्नीच्या अंगावर दारू ओतली अन्....; जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हादरलं!
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
Embed widget