IPL 2026 Latest Points Table: सगळ्या दिग्गजांचा अंदाज चुकवला, हलक्यात घेतलेले 2 संघ टॉपवर; पाहा IPL चे पॉइंट्स टेबल
IPL 2026 Latest Points Table: आयपीएल 2026 च्या हंगामात आतापर्यंत प्रत्येक संघाचे चार सामने झाले आहेत. आतापर्यंत आयपीएलच्या पॉइंट्स टेबलमध्ये अनेकदा उलथापालथ पाहायला मिळाले.

IPL 2026 Latest Points Table: आयपीएल 2026 च्या (IPL 2026) हंगामात आतापर्यंत प्रत्येक संघाचे चार सामने झाले आहेत. आतापर्यंत आयपीएलच्या पॉइंट्स टेबलमध्ये अनेकदा उलथापालथ पाहायला मिळाले. आयपीएल सुरु होण्याआधी अनेक माजी दिग्गज क्रिकेटपटूंनी कोणते 4 संघ क्वालीफाय होतील, याचा अंदाज व्यक्त केला होता. अद्याप आयपीएलचे बरेच सामने शिल्लक आहेत. परंतु राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि पंजाब किंग्सच्या (Punjab Kings) कामगिरीने सर्वांना आश्चर्यचकीत केले आहे. (IPL 2026 Latest Points Table)
अनेक माजी क्रिकेटपटूंनी मुंबई इंडियन्स, सनरायझर्स हैदराबाद, चेन्नई सुपर किंग्स चांगली कामगिरी करतील, अशी भविष्यवाणी केली होती. तसेच अनेकांनी राजस्थान आणि पंजाबचं टॉप 4 साठी नावही घेतलं नव्हतं. त्यामुळे या सगळ्या दिग्गजांचा या दोन संघाने अंदाज चुकवल्याचे दिसून येत आहे. (IPL 2026 Latest Points Table)
राजस्थान अव्वल, पंबाज दुसऱ्या स्थानावर- (IPL 2026 Points Table)
राजस्थान रॉयल्सने 4 सामने खेळले असून चारही सामन्यात विजय मिळवला आहे. राजस्थान सध्या 8 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. पंजाब किंग्सने 4 सामने खेळले असून 3 सामन्यात विजय मिळत 7 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु मुंबई इंडियन्सविरुद्धच्या विजयानंतर तिसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. सध्या बंगळुरुचे 6 गुण आहेत. तर मुंबई इंडियन्स 2 गुणांसह आठव्या क्रमांकावर, चेन्नई सुपर किंग्स नवव्या आणि कोलकाता नाईट रायडर्स दहाव्या स्थानावर आहे. (IPL 2026 Latest Points Table)
𝘼 𝙍𝙤𝙮𝙖𝙡 𝙇𝙚𝙖𝙙 🔝@rajasthanroyals remain unbeaten and lead the standings after Week 2⃣ 🩷
— IndianPremierLeague (@IPL) April 12, 2026
Which team will end their winning reign? 🤔✍️#TATAIPL | #KhelBindaas pic.twitter.com/4XA36NoMZe
दिल्ली चौथ्या, गुजरात पाचव्या स्थानावर- (IPL 2026 Latest Points Table)
दिल्ली कॅपिट्ल्स आणि गुजरात टायटन्स अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानी आहेत. गुजरातच्या तुलनेत नेट रनरेट चांगला असल्याने दिल्ली पॉइंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानी आहे. सहाव्या स्थानी असलेल्या लखनौ सुपर जायंट्सच्या खात्यातही दिल्ली आणि गुजरातप्रमाणे 4 गुण आहेत. सनरायजर्स हैदराबाद एका विजयासह सातव्या स्थानी आहेत. (IPL 2026 Latest Points Table)
संबंधित बातमी:




















