एक्स्प्लोर

ठरलं रे ठरलं! IPL 2025 ची तारीख आली, 'या' दिवसापासून रंगणार थरार, BCCI च्या उपाध्यक्षांनीच केली घोषणा! 

IPL 2025 Timetable : आज बीसीसीआयच्या सचिवाची निवड करण्यात आली. त्यासाठी मुंबईत बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीनंतर आयपीएल कधीपासून चालू होणार आहे, याबाबत महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे.

IPL 2025 Timetable First Match : नव्या वर्षाच्या सुरुवातीनंतर क्रिकेटप्रेमींना आता आयपीएलच्या आगामी पर्वाची उत्सुकता लागली आहे. सगळेच क्रिकेटप्रेमी आपापल्या संघाच्या विजायासाठी आतापासूनच प्रार्थना करत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या वर्षाचा आयपीएल नेमका कधीपासून चालू होणार? हे विचारले जात होते. असे असतानाच आता आयपीएल 2025  (IPL 2025) च्या पहिल्या समान्याची तारीख समोर आली आहे. खुद्द बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनीच त्याबाबतची ठोस माहिती दिली आहे. 

राजीव शुक्ला यांनीच दिली माहिती

आज बीसीसीआयच्या सचिवपदी माजी क्रिकेटर देवजीत सैकिया यांची निवड करण्यात आली. तसेच बीसीसीआयच्या कोषाध्यक्षपदी प्रभजीत सिंग भाटीया यांची निवड करण्यात आली. त्यासाठी मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीनंतर बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आयपीएल 2025 विषयी महत्त्वाची माहिती दिली. येत्या 23 मार्च रोजीपासून आयपीएल चालू होईल, असे शुक्ला यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. 

2024 साली आयपीएल कधीपासून चालू झाला होता? 

 गेल्या वर्षीदेखील आयपीएलचा थरार चांगलाच रंगला होता. 2024 साली आयपीएलचे सामने 22 मार्च रोजी चालू झाले होते. या साली पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात रंगला होता. तर 26 मे रोजी या पर्वाचा अंतिम सामना खेळवला गेला होता. चेन्नईमधील एमए चिदंबरम स्टेडियमवर हा सामना झाला होता. 2024 सालच्या आयपीएल ट्रॉफीवर कोलकाता नाईट रायडर्स या संघाने आपलं नाव कोरलं होतं. 

दरम्यान, राजीव शुक्ला यांनी आयपीएलसोबतच WPL बद्दलही माहिती दिली आहे.  WPL च्या सामन्यांबाबत सर्वाकाही ठरवण्यात आले आहे. लवकरच याबाबतची घोषणा केली जाईल, असे शुक्ला यांनी सांगितले. त्यामुळे यंदाच्या WPL मध्ये काय विशेष असणार तसेच आयपीएल 2025 मध्ये पहिला सामना कोणामध्ये रंगणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. येत्या 18 आणि 19 जानेवारी रोजी बीसीसीआयची पुढची बैठक होणार आहे. या बैठकीत चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत चर्चा होणार आहे.

हेही वाचा :

Devajit Saikia : देवजित सैकिया यांची BCCI च्या सचिवपदी निवड!

IND vs ENG : ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेलं 5 मोठे मुद्दे

Cricketer and Actress : पाच अभिनेत्रींनी क्रिकेटर असलेल्या खेळाडूंसोबत केला होता विवाह, पण घटस्फोट घ्यायलाही वेळ लावला नाही

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Amit Shah : शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शनSantosh Deshmukh Case | आरोपींना जर सोडलं तर माझा खून करतील, मी स्वत: संपवून घेतो- धनंजय देशमुख100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP MajhaDevendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Amit Shah : शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
IND vs ENG : ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेलं 5 मोठे मुद्दे
ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेले 5 मोठे मुद्दे
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  
Food Poisoning : धक्कादायक! अमरावतीच्या गोल्डन फायबर कंपनीत विषबाधा; शेकडो कामगारांची प्रकृती बघडली
धक्कादायक! अमरावतीच्या गोल्डन फायबर कंपनीत विषबाधा; शेकडो कामगारांची प्रकृती बघडली
Police Custody : पोलीस कोठडीत सर्वाधिक मृत्यू होण्याचं प्रमाण कोणत्या राज्यात? देशातील धक्कादायक आकडेवारी
पोलीस कोठडीत सर्वाधिक मृत्यू होण्याचं प्रमाण कोणत्या राज्यात? देशातील धक्कादायक आकडेवारी
Embed widget