IPL 2025: आयपीएलमधील फ्रँचायझी पाच खेळाडूंना कायम ठेवू शकणार आहे. परंतु त्यानंतर लिलावासाठी संघाकडे फक्त 45 कोटी रुपये शिल्लक राहतील, ज्यामुळे त्यांना उर्वरित 20 खेळाडू खरेदी करावे लागतील. अनकॅप्ड खेळाडूला 4 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवता येईल. अनकॅप्ड खेळाडू कोणत्याही देशाचा असू शकतो, असं आयपीएलच्या बैठकीत ठरवण्यात आले आहे. 


आयपीएलमधील (IPL 2025) एखाद्या संघाने 5 खेळाडूंना कायम केले, तर त्यांना तब्बल 75 कोटी रुपये मोजावे लागणार आहे. पहिल्या तीन खेळाडूंना अनुक्रमे 18, 14 आणि 11 कोटी रुपये मोजावे लागतील. तसेच जर संघांनी आणखी दोन खेळाडूंना संघात कायम केले, तर त्यांना 18 आणि 14 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. लिलावात प्रत्येक वेळी परदेशी आणि भारतीय खेळाडूंना कायम ठेवण्याची मर्यादा होती, मात्र यावेळी तसे नाही. फ्रँचायझीची इच्छा असेल तर ती पाचही भारतीय किंवा पाच परदेशी खेळाडूंना कायम ठेवू शकते.






संघांच्या पर्सची मर्यादा 115-120 कोटी 


यंदा संघांच्या पर्समधील पैशांची मर्यादाही वाढविण्यात येण्याची दाट शक्यता आहे. 2024 च्या सत्रात प्रत्येक संघाला 100 कोटी रुपये खर्च करण्याची मुभा होती. ही वाढ 115 ते 120 कोटींपर्यंत अपेक्षित आहे.


आयपीएलमधील खेळाडू आणखी मालामाल होणार-


आयपीएल खेळणाऱ्या खेळाडूला प्रत्येक सामन्यासाठी 7.5 लाख रुपये देण्यात येणार आहेत. तसेच आयपीएलच्या एका हंगामात सर्व साखळी सामने खेळणाऱ्या क्रिकेटपटूला त्याच्या कराराच्या रकमेव्यतिरिक्त 1 कोटी 05 लाख रुपये बोनसही देण्यात येणार आहे. त्यामुळे आयपीएलमधील खेळाडू आणखी मालामाल होणार आहेत. त्यासाठी प्रत्येक संघाला 12.60 कोटी रुपये एका सत्रासाठी सामना शुल्क मंजूर करण्यात आले आहे. हा ऐतिहासिक निर्णय असल्याचेही जय शाह यांनी सांगितले.


इम्पॅक्ट प्लेअर नियम कायम-


आयपीएलच्या शनिवारी झालेल्या संचालन परिषदेच्या बैठकीत 2025 सत्रासाठी बहुचर्चित 'इम्पॅक्ट प्लेअर' नियम कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. इम्पॅक्ट प्लेअरचा नियम आयपीएल 2023 च्या दरम्यान आणण्यात आला आणि तेव्हापासून या नियमाबाबत मतमतांतरे आहेत. कारण या नियमामुळे अष्टपैलू खेळाडूंचे महत्त्व कमी झाले आहे.


संबंधित बातमी:


दोघं पदार्पण करणार, एक 3 वर्षांनी खेळणार; बांगलादेशविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, गौतम गंभीरच्या मनात काय?


IPL मध्ये आता खेळाडूंची मनमानी चालणार नाही, अन्यथा थेट 2 वर्षांची बंदी; बीसीसीआयने उचललं मोठं पाऊल