IPL 2025 MS Dhoni: आयपीएल संचालन परिषदेची महत्त्वपूर्ण बैठक 29 सप्टेंबर रोजी पार पडली. या बैठकीत आयपीएलबाबत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये अनकॅप्ड प्लेअरबाबतही बीसीसीआयने निर्णय घेतला आहे. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्सकडून एमएस धोनी (MS Dhoni) पुन्हा एकदा आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे. 


आयपीएलमधील (IPL) फ्रँचायझी पाच खेळाडूंना कायम ठेवू शकणार आहे. परंतु त्यानंतर लिलावासाठी तुमच्याकडे फक्त 45 कोटी रुपये शिल्लक राहतील, ज्यामुळे त्यांना उर्वरित 20 खेळाडू खरेदी करावे लागतील. अनकॅप्ड खेळाडूला 4 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवता येईल. अनकॅप्ड खेळाडू कोणत्याही देशाचा असू शकतो. त्यामुळे एमएस धोनी (MS Dhoni) यंदाच्या आयपीएलच्या हंगामात अनकॅप्ड खेळाडू म्हणून खेळताना दिसेल. मात्र एमएस धोनीला फक्त 4 कोटी रुपये मिळतील. 


एमएस धोनीला यंदा करोडो रुपयांचं नुकसान-


एमएस धोनीला आयपीएल 2024 मध्ये खेळण्यासाठी 12 कोटी रुपये मिळाले होते, परंतु अनकॅप्ड खेळाडूचे कमाल वेतन 4 कोटी रुपये आहे. याचा अर्थ अनकॅप्ड खेळाडू झाल्यावर धोनीचा पगार तीन पटीने कमी होईल. गतवर्षी धोनीने चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपद सोडले आणि संघाची कमान रुतुराज गायकवाडकडे सोपवली. गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली चेन्नईचा संघ गेल्या वर्षी गुणतालिकेत पाचव्या स्थानावर होता.






काय आहे अनकॅप्ड खेळाडूचा नियम?


आता आयपीएलमध्ये जर एखादा खेळाडूला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होऊन पाच वर्षे किंवा त्याहून अधिक काळ लोटला असेल, त्याचा मेगा लिलावात अनकॅप्ड खेळाडू म्हणून समावेश होईल. आयपीएलमध्ये हा नियम आधी लागू होता. मात्र 2022 च्या लिलावापूर्वी आयपीएलच्या समितीने या निर्णयावर बंदी घातली होती. त्यामुळे यंदाच्या आयपीएलमध्ये धोनी लिलावात आल्यास अनकॅप्ड खेळाडूंच्या यादीत त्याचा समावेश होईल. एमएस धोनीने 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतासाठी एकही सामना खेळला नव्हता, तर 15 ऑगस्ट 2020 रोजी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केला होता.






दोन वर्षांची बंदी-


आयपीएलच्या गेल्या अनेक मोसमात लिलावात निवड झाल्यानंतर काही खेळाडूंनी हंगाम सुरू होण्यापूर्वी खेळण्यास नकार दिल्याचे दिसून येत होते. आता याबाबतही एक नियम जाहीर करण्यात आला आहे, ज्यामध्ये लिलावात एखादा खेळाडू निवडला गेला आणि नंतर त्याने खेळण्यास नकार दिला तर त्या खेळाडूला स्पर्धेत भाग घेण्यास बंदी घालण्यात येईल आणि खेळाडूंच्या लिलावातही 2 वर्षांची बंदी घालण्यात येणार आहे.


संबंधित बातमी:


IPL 2025: रोहित-विराटने नाराजी व्यक्त केलेल्या आयपीएलमधील 'Impact Player' नियमाचं काय होणार?;  BCCIने केलं जाहीर