IPL 2025 BCCI: आयपीएल 2025 च्या स्पर्धेची (IPL 2025) उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे. लवकरच मेगा लिलाव आयोजित करण्यात येणार आहे. त्याआधी बीसीसीआयने (BCCI) एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीत यंदाच्या आयपीएलच्या हंगामात काही नवीन नियम लागू करणार असल्याची माहिती समोर आली आहे.


आयपीएलच्या लिलावात (IPL 2025 Auction) नोंदणी केल्यानंतर खेळाडूची निवड झाली आणि त्याने आयपीएलचा (IPL) हंगाम सुरु होण्यापूर्वीच माघार घेतल्यास संबंधित खेळाडूला 2 वर्ष आयपीएलमध्ये भाग घेण्यास आणि खेळाडूंच्या लिलावात नाव नोंदवण्यास बंदी घालण्यात येणार आहे. आयपीएलच्या गेल्या अनेक मोसमात लिलावात निवड झाल्यानंतर काही खेळाडूंनी हंगाम सुरू होण्यापूर्वी खेळण्यास नकार दिल्याचे दिसून येत होते. त्यामुळे बीसीसीआयने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. 






पाच खेळाडूंना कायम ठेवू शकणार-


आयपीएलमधील फ्रँचायझी पाच खेळाडूंना कायम ठेवू शकणार आहे. परंतु त्यानंतर लिलावासाठी तुमच्याकडे फक्त 45 कोटी रुपये शिल्लक राहतील, ज्यामुळे त्यांना उर्वरित 20 खेळाडू खरेदी करावे लागतील. अनकॅप्ड खेळाडूला 4 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवता येईल. अनकॅप्ड खेळाडू कोणत्याही देशाचा असू शकतो. एखाद्या संघाने 5 खेळाडूंना कायम केले, तर त्यांना तब्बल 75 कोटी रुपये मोजावे लागणार आहे. पहिल्या तीन खेळाडूंना अनुक्रमे 18, 14 आणि 11 कोटी रुपये मोजावे लागतील. तसेच जर संघांनी आणखी दोन खेळाडूंना संघात कायम केले, तर त्यांना 18 आणि 14 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. लिलावात प्रत्येक वेळी परदेशी आणि भारतीय खेळाडूंना कायम ठेवण्याची मर्यादा होती, मात्र यावेळी तसे नाही. फ्रँचायझीची इच्छा असेल तर ती पाचही भारतीय किंवा पाच परदेशी खेळाडूंना कायम ठेवू शकते.


MS धोनी अनकॅप्ड खेळाडू म्हणून आयपीएलमध्ये खेळणार-


आता आयपीएलमध्ये जर एखादा खेळाडूला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होऊन पाच वर्षे किंवा त्याहून अधिक काळ लोटला असेल, त्याचा मेगा लिलावात अनकॅप्ड खेळाडू म्हणून समावेश होईल. आयपीएलमध्ये हा नियम आधी लागू होता. मात्र 2022 च्या लिलावापूर्वी आयपीएलच्या समितीने या निर्णयावर बंदी घातली होती. त्यामुळे यंदाच्या आयपीएलमध्ये धोनी लिलावात आल्यास अनकॅप्ड खेळाडूंच्या यादीत त्याचा समावेश होईल. एमएस धोनीने 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतासाठी एकही सामना खेळला नव्हता, तर 15 ऑगस्ट 2020 रोजी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केला होता.


संबंधित बातमी:


दोघं पदार्पण करणार, एक 3 वर्षांनी खेळणार; बांगलादेशविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, गौतम गंभीरच्या मनात काय?