IPL 2025 Impact Player Rule: आयपीएल 2023 च्या हंगामात एक नियम जोडला गेला, ज्याला 'इम्पॅक्ट प्लेअर' नियम (Impact Player Rule) असे नाव देण्यात आले. मात्र या नियमावरुन विविध खेळाडूंनी नाराजी व्यक्ती केली होती. त्यामुळे यंदाच्या आयपीएल इम्पॅक्ट प्लेअर नियमाचं काय होणार?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. याचदरम्यान आता इम्पॅक्ट प्लेयर नियमावरुन बीसीसीआयने आपली भूमिका जाहीर केली आहे. 


इम्पॅक्ट प्लेअर नियम कायम-


आयपीएलच्या (IPL 2025 Auction) शनिवारी झालेल्या संचालन परिषदेच्या बैठकीत 2025 सत्रासाठी बहुचर्चित 'इम्पॅक्ट प्लेअर' नियम कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. इम्पॅक्ट प्लेअरचा नियम आयपीएल 2023 च्या दरम्यान आणण्यात आला आणि तेव्हापासून या नियमाबाबत मतमतांतरे आहेत. कारण या नियमामुळे अष्टपैलू खेळाडूंचे महत्त्व कमी झाले आहे.






'इम्पॅक्ट प्लेअर' नियमाची चर्चा का?


'टेस्ट केस' म्हणून आणलेल्या 'इम्पॅक्ट प्लेअर' नियमाचा सध्याच्या आयपीएलवर खूप परिणाम झाला आहे. या मोसमात आतापर्यंत संघांनी 8 वेळा 250 धावांचा टप्पा ओलांडला आहे. अनेक खेळाडू, प्रशिक्षक आणि तज्ञांचा असा विश्वास आहे की हा नियम गोलंदाजांसाठी हानिकारक आहे, कारण यामुळे संघांना लांब फलंदाजी करण्याची संधी मिळते.


'इम्पॅक्ट प्लेअर' नियम काय आहे?


इम्पॅक्ट प्लेअरच्या नियमानुसार, नाणेफेकीनंतर, प्रत्येक संघाला त्यांच्या प्लेइंग इलेव्हन व्यतिरिक्त जास्तीत जास्त पाच पर्यायी खेळाडूंची नावे देण्याची परवानगी आहे. खेळादरम्यान कोणत्याही वेळी, त्यापैकी एक – ज्याला इम्पॅक्ट प्लेअर म्हणतात – प्लेइंग इलेव्हनमधील कोणत्याही सदस्याची जागा घेऊ शकतो.


सर्वच संघाकडे बुमराह आणि राशिदसारखे गोलंदाज नाही-


मनोरंजन हा खेळाचा एक पैलू आहे पण त्यात समतोल असायला हवा. यामुळे खेळाचा समतोल बिघडला आहे आणि मलाच नव्हे तर अनेकांना असे वाटते. क्रिकेट हा 12 नव्हे तर 11 खेळाडूंचा खेळ आहे. सर्वच संघाकडे बुमराह आणि राशिद खानसारखे गोलंदाज नाहीय, असं विराट कोहलीने सांगितले.


रोहित शर्मा काय म्हणाला होता?


याबाबत भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला, "हा नियम अष्टपैलू खेळाडूंसाठी चांगला नाही, कारण त्यांना कमी गोलंदाजी करण्याची संधी मिळते. मात्र, या नियमामुळे दोन भारतीय खेळाडूंना अतिरिक्त खेळण्याची संधी मिळते, ही सकारात्मक बाब आहे."


संबंधित बातमी:


दोघं पदार्पण करणार, एक 3 वर्षांनी खेळणार; बांगलादेशविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, गौतम गंभीरच्या मनात काय?