IPL 2022 Retention: सनरायजर्सने सोडलं; डेविड वॉर्नर म्हणतो, पाठिंब्यासाठी धन्यवाद, आता Chapter Closed!
IPL 2022 Retention: डेव्हिड वॉर्नरनं यूएईमध्ये नुकत्याच झालेल्या टी-20 विश्वचषकात चमकदार कामगिरी केली.
IPL 2022 Retention: भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या पुढील हंगामासाठी आठ फ्रंचायझींनी त्यांच्या रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केलीय. गतविजेच्या चेन्नई सुपर किंग्ज, मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्सनं प्रत्येकी चार खेळाडूंना रिटेन केलंय. सनरायझर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरनं प्रत्येकी तीन खेळाडूंना रिटेन केलं आहे. तर, पंजाबच्या संघानं फक्त दोनच खेळाडूंना रिटेन केलंय. हैदराबादनं तडाखेबाज फलंदाज डेव्हिड वार्नरला (David Warner) रिलीज केल्यान चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. याचदरम्यान, डेव्हिड वार्नरनं सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट केलीय.
सनरायझर्स हैदराबादनं केन विल्यमसन (14 कोटी), अब्दुल सामद (4 कोटी) आणि उमरान मलिक (4 कोटी) रिटेन केलंय. हैदराबादच्या संघातून वगळल्यानंतर डेव्हिड वार्नरनं ट्वीटरवर एक भावूक पोस्ट केलीय. ज्यात त्यानं म्हटलंय की, "चॅप्टर क्लोज! सनरायझर्सकडून खेळत असताना मिळालेल्या पाठिंब्याबद्दल सर्व चाहत्यांचे मनापासून आभार मानतो. हे खूप प्रोस्ताहित करणारं होतं", असंही त्यानं म्हटलंय. संघातून वेगळे झाल्यानंतर डेव्हिड वार्नर आता लिलावात येणार आहेत. डेव्हिड वॉर्नरसाठी कोणता संघ मोठी बोली लावतो? हे पाहावं लागेल. डेव्हिड वॉर्नरनं यूएईमध्ये नुकत्याच झालेल्या टी-20 विश्वचषकात चमकदार कामगिरी केली. त्याला टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरवण्यात आलं. अशा परिस्थितीत त्याला सर्वच संघ आपल्यासोबत सामावून घेण्यासाठी पुढे येतील.
आयपीएलच्या पुढील हंगामात समाविष्ट केलेल्या अहमदाबाद आणि लखनौच्या या दोन नवीन संघांना खेळाडू निवडण्याची संधी दिली जाणार आहे. या प्रक्रियेनंतरच आयपीएल 2022च्या मेगा ऑक्शनचं वेळापत्रक ठरवण्यात येईल. आयपीएलचा पुढील हंगामात दोन नवे संघानं ऍन्ट्री केल्यामुळे ही स्पर्धा आणखी रंगतदार होण्याची अपेक्षा केली जात आहे.
हे देखील वाचा-
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
- IPL Retention 2022 : जडेजा-पंतला धोनीपेक्षा जास्त पैसे, कोहलीच्या पगारातून दोन कोटींची कपात
- MI Complete Retention List: मुंबई इंडियन्सनं 'या' खेळाडूंना केलं रिटेन; यॉर्कर किंगसह आक्रमक फलंदाजांचा यादीत समावेश
- शाब्बास रे पठ्ठ्यांनो, चांगली खेळपट्टी बनवलीत, राहुल द्रविडकडून ग्राऊंड स्टाफला 35 हजारांचं बक्षीस