Umesh Yadav : उमेश 43 महिन्यानंतर खेळला आंतरराष्ट्रीय टी20 सामना, 'या' आकडेवारीच्या जोरावर मिळवली संघात जागा
Umesh Yadav in Team : भारताचा अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमी याला कोरोनाची बाधा झाल्यामुळे त्याच्या जागी संघात उमेश यादव (Umesh Yadav) याला संधी मिळाली असून त्यानंतर त्याला अंतिम 11 मध्येही ठेवले.
IND vs AUS : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) टी20 मालिकेपूर्वीच अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) याला कोरोनाची बाधा झाल्यामुळे त्याच्या जागी संघात उमेश यादव (Umesh Yadav) याला संधी मिळाली, त्यामुेळे तब्बल 43 महिन्यानंतर उमेश पुन्हा आंतरराष्ट्रीय टी20 सामना खेळला. गोलंदाज उमेश यादवने याआधी फेब्रुवारी 2019 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच शेवटचा T20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. ज्यामुळे तब्बल 43 महिन्यांनंतर उमेशचं भारतीय टी-20 संघात पुनरागमन झालं आहे.
काऊंटीमधून दुखापतीमुळे परतला
उमेश मागील काही महिने इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेट खेळत आहे. तो हा रॉयल लंडन कपमध्ये मिडलसेक्स काउंटी संघाकडून खेळत होता. विशेष म्हणजे तो या स्पर्धेत त्याच्या संघासाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होता. पण दुखापतीमुळे तो भारतात उपचारासाठी आला, ज्यानंतर त्याने तूर्तास काऊंटी क्रिकेटमधून माघार घेतली आहे. त्यानंतर शमीच्या संघाबाहेर जाण्यानं त्याला अंतिम 11 मध्येही स्थान मिळालं.
आकडेवारीच्या जोरावर उमेश यादव संघात
मागील बराच काळ टीम इंडियापासून दूर असल्याने उमेश यादवने आपल्या गोलंदाजीवर काम करत दमदार प्रदर्शन केलं. उमेशने रॉयल लंडन चषक स्पर्धेत मिडलसेक्स काउंटी संघाकडून 7 सामन्यात 16 विकेट घेतल्या. यादरम्यान त्याची सरासरी 20.25 इतकी होती. यावेळी, उमेश यादवची सर्वोत्तम कामगिरी म्हणजे 33 धावांत 5 विकेट्स घेणे ही होती. याशिवाय उमेश यादवने भारतासाठी आतापर्यंत 52 कसोटी सामन्यांव्यतिरिक्त 75 एकदिवसीय आणि 7 टी-20 सामने खेळले आहेत. तसंच उमेशने आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये देखील शानदार प्रदर्शन केलं. कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना त्याने 7 च्या इकोनॉमी रेटने 14 सामन्यात16 विकेट्स घेतल्या. या खेळीच्या जोरावरच त्याला भारतीय संघात पहिल्या टी20 सामन्यासाठी स्थान मिळालं. पण सामन्यात तो खास कामगिरी करु शकला नाही त्याने 2 विकेट्स घेतल्या मात्र 2 ओव्हरमध्येच त्याने 27 धावाही दिल्या.
भारत 4 विकेट्सनी पराभूत
सामन्यात भारत 4 विकेट्सनी पराभूत झाला. सामन्यात नाणेफेक जिंकत कांगारुनी प्रथम गोलंदाजी घेतली. ज्यानंतर भारताने केएल राहुल, हार्दीक यांच्या अर्धशतकाच्या जोरावर 209 धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाला दिले. पण ऑस्ट्रेलियानेही सुरुवातीपासून कमाल फलंदाजी केली. कॅमरुन ग्रीनचं धडाकेबाज अर्धशतक आणि वेड-स्मिथच्या महत्त्वपूर्ण खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाचा संघ 4 विकेट्सनी सामना जिंकला.
हे देखील वाचा-