एक्स्प्लोर

IPL 2020 | ठरलं...! आयपीएल 2020ची फायनल 'या' शहरात; 24मे रोजी ठरणार विजेता

आयपीएलच्या 13व्या हंगामाला 29 मार्च पासून सुरु होणार असून या स्पर्धेची फायनल 24 मे रोजी खेळवण्यात येणार आहे. आयपीएलच्या 13व्या हंगामाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

नवी दिल्ली : इंडियन प्रिमीयर लीग अर्थात (IPL) 2020 ही स्पर्धा 29 मार्च पासून सुरु होणार आहे. या स्पर्धेची फायनल 24 मे रोजी मुंबईमध्ये खेळवण्यात येणार आहे. आयपीएलच्या 13व्या हंगामाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तसेच यंदाच्या हंगामातील सर्व सामने दरवर्षीप्रमाणे रात्री आठ वाजता सुरू केले जाणार आहेत. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआई) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी यावेळी बोलताना हे स्पष्ट केलं की, आयपीएलच्या 13व्या हंगामाचा अंतिम सामना हा अहमदाबाद येथे न होता मुंबईमध्ये होणार आहे. या बैठकीत बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यासह आणि सचिव जय शाह हे उपस्थित होते.

बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना ते म्हणाले की, 'आयपीएलच्या रात्रीच्या सामन्यांच्या वेळेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सर्व सामने रात्री ८ वाजता खेळवण्यात येतील. हे सामने 7.30 वाजता व्हावेत, अशी चर्चा झाली. मात्र, बैठकीत तसा कोणताच निर्णय झालेला नाही. यावर्षी केवळ पाच सामनेच 4 आणि 8 वाजल्यापासून खेळवण्यात येणार आहेत. तसेच, पहिल्यांदाच नोबॉलसाठी तिसऱ्या पंचाची मदत घेण्यात येणार आहे.'

गांगुली यांनी पुढे बोलताना सांगितले की, ' आयपीएल सुरू होण्यापूर्वी तीन दिवस आधी आयपीएल ऑलस्टार सामना खेळवण्यात येणार आहे. परंतु, हा सामना अहमदाबाद येथे होणार नाही. कारण तेथे स्टेडियमचे काम अजूनही सुरू आहे. या सामन्यातून उभा राहणारा आर्थिक निधी कुणाला द्यायचा? याबाबत अजून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.'

आयपीएल लिलावात पॅट कमिन्स सर्वात महागडा

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स हा आगामी आयपीएलसाठी झालेल्या लिलावात सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. कोलकाता नाईट रायडर्सनं कमिन्सवर तब्बल साडेपंधरा कोटी रुपयांची यशस्वी बोली लावली. आयपीएलच्या या लिलावात ऑस्ट्रेलियाच्याच ग्लेन मॅक्सवेलला 10 कोटी 75 लाख रुपयांची बोली लागली. किंग्स इलेव्हन पंजाबनं मॅक्सवेलवर पावणेअकरा कोटींची बोली लावली. दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू ख्रिस मॉरिसवर बंगलोरनं दहा कोटी रुपयांची बोली लावली. वेस्ट इंडिजचा शेल्डन कॉटरेल आणि शिमरॉन हेटमायरला अनुक्रमे साडेआठ कोटी आणि पावणेआठ कोटी रुपयांची बोली लागली. कॉटरेलला पंजाबनं, तर हेटमायरला दिल्लीनं विकत घेतलं. लेग स्पिनर पियुष चावला हा भारताचा सर्वात महागडा खेळाडू ठरला. पियुष चावलाला चेन्नई सुपर किंग्सनं सहा कोटी 75 लाखांची बोली लावली.

संबंधित बातम्या :

IPL 2020 | 'या' तारखेला आयपीएलच्या 13 व्या सीझनचा वाजणार बिगुल

IPL auction : आयपीएल लिलावात पॅट कमिन्स सर्वात महागडा खेळाडू तर मुंबईचा यशस्वी जैस्वाल करोडपती

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Indians:  जयवर्धनेला काढून पोलार्डला आणलं, आता लासिथ मलिंगासह तिघांना बाहेरचा रस्ता दाखवला, मुंबई इंडियन्सची मोठी खेळी
जयवर्धनेला काढून पोलार्डला आणलं, आता लासिथ मलिंगासह तिघांना बाहेरचा रस्ता दाखवला, मुंबई इंडियन्सची मोठी खेळी
IND vs NZ 4th T20 : घरच्या मैदानावर न्यूझीलंडची धडकी भरली! ऑकलंड ईडन पार्कवर टीम इंडियाचा खतरनाक रेकॉर्ड, किवी संघाला घाम फुटला
घरच्या मैदानावर न्यूझीलंडची धडकी भरली! ऑकलंड ईडन पार्कवर टीम इंडियाचा खतरनाक रेकॉर्ड, किवी संघाला घाम फुटला
IND W vs ZIM W : टीम इंडियात उभी फूट? सामन्यानंतर स्मृती मानधना-हरमनप्रीत कौरमध्ये 'नो हँडशेक'; ड्रेसिंग रूममध्ये नक्की चाललंय तरी काय? VIDEO पाहून सगळेच हादरले
टीम इंडियात उभी फूट? सामन्यानंतर स्मृती मानधना-हरमनप्रीत कौरमध्ये 'नो हँडशेक'; ड्रेसिंग रूममध्ये नक्की चाललंय तरी काय? VIDEO पाहून सगळेच हादरले
Vaibhav Sooryavanshi : 6,6,6,6,4,4,4,4... 19 चेंडूत धुमाकूळ घातला, तरीही न्यूझीलंडविरुद्ध चौथ्या टी-20मधून वैभव सूर्यवंशी OUT? टीम इंडियात नेमकं काय चाललंय? जाणून घ्या कारण
6,6,6,6,4,4,4,4... 19 चेंडूत धुमाकूळ घातला, तरीही न्यूझीलंडविरुद्ध चौथ्या टी-20मधून वैभव सूर्यवंशी OUT? टीम इंडियात नेमकं काय चाललंय? जाणून घ्या कारण

व्हिडीओ

Ravindra Dhangekar Pune: शिक्षक सरकारवर नाराज का? रवींद्र धंगेकरांनी सांगितलं पराभवाचं कारण
Sanjay Raut On BJP : महाराष्ट्रात बॅलेटवर निवडणुका झाल्या, तुम्ही हारला आहात! राऊतांनी सुनावलं
Raj Thackeray Karjat Full Speech : महाराष्ट्र उद्योगपतींच्या चावीवर चालणार नाही! राज ठाकरेंची गर्जना
Shiv Sena PC On Pradeep Purnekar Case :एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
Pratap Patil On Win : मराठवाड्यातील पदवीधरांच्या रोजगारासाठी मी काम करणार : प्रताप पाटील

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil: तेव्हा मी जातीवादी नव्हतो का? देशाला नव्हे जगाला माहितीय, आमच्याकडे बहुमत, जनक्षोभ निर्माण होईल; सतेज पाटलांचे हसन मुश्रीफांना प्रत्युत्तर, म्हणाले, यांना गोकुळ बंद पाडायचाय
तेव्हा मी जातीवादी नव्हतो का? देशाला नव्हे जगाला माहितीय, आमच्याकडे बहुमत, जनक्षोभ निर्माण होईल; सतेज पाटलांचे हसन मुश्रीफांना प्रत्युत्तर, म्हणाले, यांना गोकुळ बंद पाडायचाय
Pune Graduate And Teachers Election Result 2026: पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निकाल: संघटनात्मक ताकद अन् नाराजीचे फॅक्टर ठरले निर्णायक; जाणून घ्या दोन्ही निकालांची कारणं
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निकाल: संघटनात्मक ताकद अन् नाराजीचे फॅक्टर ठरले निर्णायक; जाणून घ्या दोन्ही निकालांची कारणं
अमूलच्या दावणीला गोकुळ बांधण्यासाठी तुम्ही सगळं कारस्थान करताय, हे आम्हाला कळत नाही का? राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल, विश्वजित कदम अन् सुप्रिया सुळेंचाही सडकून प्रहार
अमूलच्या दावणीला गोकुळ बांधण्यासाठी तुम्ही सगळं कारस्थान करताय, हे आम्हाला कळत नाही का? राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल, विश्वजित कदम अन् सुप्रिया सुळेंचाही सडकून प्रहार
Abdul Sattar : युती टिकवायची की तोडायची भाजपने ठरवावं, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात निवडणुका झाल्या, आता त्यांनीच मुख्यमंत्री व्हावं : अब्दुल सत्तार
युती टिकवायची की तोडायची भाजपने ठरवावं, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात निवडणुका झाल्या, आता त्यांनीच मुख्यमंत्री व्हावं : अब्दुल सत्तार
Sunetra Pawar: पदवीधर, शिक्षक निकालानंतर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, 'आम्ही आत्मपरीक्षण करू; सुधारण्याचा प्रयत्न करू...'
पदवीधर, शिक्षक निकालानंतर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, 'आम्ही आत्मपरीक्षण करू; सुधारण्याचा प्रयत्न करू...'
Hasan Mushrif on Satej Patil: सतेज पाटलांनी जातीयवादी प्रचार केला, आता गोकुळचा अध्यक्ष निवडून दाखवावाच; हसन मुश्रीफांचं ओपन चॅलेंज
सतेज पाटलांनी जातीयवादी प्रचार केला, आता गोकुळचा अध्यक्ष निवडून दाखवावाच; हसन मुश्रीफांचं ओपन चॅलेंज
Meenakshi Shinde मोठी बातमी : मीनाक्षी शिंदेंचा राजीनामा, प्रदीप पूर्णेकर प्रकरणात चौकशीनंतर निर्णय
मोठी बातमी : मीनाक्षी शिंदेंचा राजीनामा, प्रदीप पूर्णेकर प्रकरणात चौकशीनंतर निर्णय
Pune Accident News: वाहनावरील नियंत्रण सुटलं अन्...; दुचाकीची वाहनाला जोरदार धडक, राजगुरुनगरमध्ये अपघातात 17 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू
वाहनावरील नियंत्रण सुटलं अन्...; दुचाकीची वाहनाला जोरदार धडक, राजगुरुनगरमध्ये अपघातात 17 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू
Embed widget