(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL Schedule 2023 : आयपीएल 2023 चं बिगुल वाजणार, लवकरच जाहीर होणार वेळापत्रक, वाचा सविस्तर
IPL 2023 : इंडियन प्रीमियर लीग 2023 सीझनचे संपूर्ण वेळापत्रक 17 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 5 वाजता घोषित केले जाऊ शकते, ज्यामध्ये सीझन मार्चच्या शेवटी सुरू होऊ शकतो.
IPL Auction 2023 : जगातील सर्वात प्रसिद्ध लीग अर्थात इंडियन प्रिमीयर लीग (IPL) स्पर्धेच्या आगामी हंगामाची सर्व क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 17 फेब्रुवारीला संध्याकाळी 5 वाजता आयपीएलच्या अधिकृत वेबसाइटवर आगामी हंगामाचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर केलं जाऊ शकतं. गतविजेता गुजरात टायटन्सचा संघ या हंगामातील पहिला सामना खेळताना दिसणार यात शंका नाही, मात्र ते कोणत्या संघाविरुद्ध खेळणार हे संपूर्ण वेळापत्रक उघड झाल्यानंतरच कळेल.
बीसीसीआयने काही दिवसांपूर्वी महिला प्रीमियर लीग (WPL) च्या पहिल्या आवृत्तीचं वेळापत्रक जाहीर केलं होते. महिला प्रीमियर लीग हंगामातील पहिला सामना 4 मार्च रोजी खेळवला जाईल, तर अंतिम सामना 26 मार्च रोजी होईल. त्यानंतरच आयपीएलचा हंगाम सुरू होईल. आयपीएलचा 16वा सीझन आणखी रोमांचक असणार आहे. कारण मिनी ऑक्शन दरम्यान अनेक संघांमध्ये मोठे बदल पाहायला मिळाले. तसंच अनुभवी फलंदाज शिखर धवन किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे, तर बेन स्टोक्स चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळताना दिसणार आहे. मागील हंगामात गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स संघ जोडल्यानंतर ही टी20 लीग आणखी मोठी झाली. दोन्ही नवीन संघांनी गेल्या हंगामात चमकदार कामगिरी करून प्लेऑफमध्ये आपलं स्थान निश्चित केलं, ज्यामध्ये गुजरात टायटन्सने हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली पहिल्या सत्रात विजेतेपदावर नाव कोरले.
अष्टपैलू खेळाडू सॅम करनला रेकॉर्डब्रेक बोली
काही महिन्यांपूर्वी कोची येथे पार पडलेल्या मिनी ऑक्शनमध्ये इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू सॅम करन याला तब्बल 18.50 कोटींना पंजाब किंग्सने (PBKS) विकत घेत रेकॉर्ड ब्रेक केला. याशिवाय कॅमरॉन ग्रीन आणि बेन स्टोक्स यांनाही तगडी किंमत मिळाली आहे. आहे. ग्रीनला 17.50 कोटींना मुंबई इंडियन्सने तर बेन स्टोक्सला 16.25 कोटींना सीएसकेनं विकत घेतलं आहे. याआधी आयपीएलच्या इतिहासात दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज अष्टपैलू ख्रिस मॉरिस (Chri Morris) सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. राजस्थान रॉयल्सने त्याला 2021 मध्ये 16.25 कोटींना खरेदी केले होते. पण यंदा त्याचा विक्रम मोडीत निघाला आहे. निकोलस पूरनलाही 16 कोटींना लखनौ सुपरजायंट्सने विकत घेतलं आहे.
इंग्लंड खेळाडूंवर पैशांचा पाऊस
टी विश्वचषक 2022 इंग्लंडनं जिंकला, त्यामुळे इंग्लंडच्या खेळाडूंना चांगली बोली लागणार हे निश्चित होते. त्यामुळे सॅम करन, बेन स्टोक्स यांना मिळालेल्या रेकॉर्डब्रे किंमतीसह युवा खेळाडू हॅरी ब्रुकलाही तब्बल 13.25 कोटींना सनरायझर्स हैदराबाद संघाने विकत घेतलंं. तर आदिल रशीदला देखील हैदराबादने 2 कोटींना विकत घेतलं आहे.
हे देखील वाचा-