Rinku Singh Wedding: रिंकू सिंह खासदार प्रिया सरोजसोबत लग्नबंधनात अडकणार; तारीख अन् ठिकाणही आलं समोर
Rinku Singh Priya Saroj Wedding: भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू रिंकू सिंह लवकरच विवाह करणार आहे.

Rinku Singh Priya Saroj Wedding: भारतीय क्रिकेट संघाचा (Team India) खेळाडू रिंकू सिंह (Rinku Singh) लवकरच विवाह करणार आहे. जौनपूरमधील मच्छलीशहर येथील समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज (MP Priya Saroj) यांच्यासोबत रिंकू सिंह लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. आगामी 8 जून रोजी साखरपूडा होणार असून 18 नोव्हेंबर रोजी वाराणसीमधील हॉटेल ताजमध्ये विवाह सोहळा पार पडणार आहे.
दोघांचे सूर कसे जुळले, ओळख कशी झाली?
रिंकू सिंह आणि प्रिया सरोज हे दोघेही एकमेकांना आधीपासूनच ओळखतात. प्रिया सरोज यांची एक मैत्रीण आहे. या मैत्रिणीचे वडील क्रिकेटर आहेत. त्यांच्याच माध्यमातून रिंकू सिंह आणि प्रिया सरोज यांची ओळख झाली होती. हे दोघेही एकमेकांना आधीपासूनच ओळखतात. दोन्ही कुटुंबांच्या सहमतीनेच हे लग्न झाले पाहिजे, असे रिंकू सिंह आणि प्रिया सरोज यांचे मत होते.
प्रिया सरोज देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात तरुण खासदार-
प्रिया सरोज यांनी दिल्ली विद्यापीठातून शिक्षण घेतले असून सर्वोच्च न्यायालयात काही काळ वकिली केली. त्यानंतर, त्यांनी समाजवादी पक्षाच्या माध्यमातून राजकारण एंट्री केली आहे. गत 2024 मध्ये एप्रिल महिन्यात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी बीपी सरोज ह्या दिग्गज राजकीय नेत्याचा पराभव करुन विजय मिळवला. वडिलानंतर आता त्यांची कन्या प्रिया सरोज येथील मतदारसंघातून लोकप्रतिनिधीत्व करत आहेत. ज्या देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात तरुण खासदार आहेत. दरम्यान, प्रिया सरोजचे वडील तुफानी सरोज देखील मछली शहर लोकसभा मतदारसंघातून तीन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. तुफानी सरोज 1999, 2004, 2009 मध्ये खासदार होते.
रिंकू सिंहची आंतरराष्ट्रीय कारकीर्द-
रिंकू सिंह प्रामुख्याने भारतासाठी टी-20 क्रिकेट खेळतो. दरम्यान रिंकूने एकदिवसीय सामने देखील खेळले आहेत. आतापर्यंत रिंकूने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 2 एकदिवसीय आणि 30 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. रिंकूने एकदिवसीय सामन्याच्या 2 डावात 55 धावा केल्या, ज्यामध्ये त्याचा सर्वोच्च धावसंख्या 38 धावा होती. याशिवाय, 22 टी-20 आंतरराष्ट्रीय डावांमध्ये, रिंकूने 46.09 च्या सरासरीने आणि 165.14 च्या स्ट्राईक रेटने 507 धावा केल्या आहेत. रिंकून 3 अर्धशतक झळकावली आहे. ज्यात सर्वाधिक धावसंख्या 69* धावा आहे.





















