मुंबईकर रोहित अन् सूर्यकुमारचा दिल्लीत गणपती डान्स; बसमधून उतरताच धरला ठेका, फुगडीही घातली, Video
Indian Cricket Team Updates: टीम इंडिया विमानतळावरून हॉटेलमध्ये पोहोचली आहे. टीम हॉटेलमध्ये पोहोचण्यापूर्वीच अनेक चाहते तिथे उपस्थित होते.
Indian Cricket Team Updates: टी-20 विश्वचषक 2024 ची (T20 World Cup 2024) स्पर्धा जिंकून टीम इंडिया (Indian Cricket Team) आज मायदेशी परतली आहे. सकाळी 6 वाजता टीम इंडियाचं विशेष विमान दिल्लीत दाखल झालं. 29 जून रोजी झालेल्या विजेतेपदाच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करत भारताने तब्बल 17 वर्षांनंतर टी-20 विश्वचषकाचे जेतेपद पटकावले. या विजयानंतर भारतीय संघ आज (4 जुलै) भारतात परतला आहे. यावेळी टीम इंडियाचे मोठ्या उत्साहात स्वागत होत आहे.
टीम इंडिया विमानतळावरून हॉटेलमध्ये पोहोचली आहे. टीम इंडिया हॉटेलमध्ये पोहोचण्यापूर्वीच अनेक चाहते तिथे उपस्थित होते. हॉटेलच्या गेटवर चाहत्यांनी रोहित शर्मासह सर्व खेळाडूंचा स्वागत केले. यावेळी बस हॉटेल बाहेर पोहताच रोहित शर्मा सूर्यकुमार यादव आणि यशस्वी जैस्वाल यांनी डान्स केला. यावेळी सूर्यकुमार मुंबईकर असल्याने त्याने मुंबई स्टाईल गणपती डान्स केल्याची प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
Suryakumar Yadav erupts in joy after landing in India. 😂❤️#INDvsPAK #ChampionsTrophy #Barbados#IndianCricketTeam #RohitSharma #Mumbai #AIC24WC #ViratKohli𓃵 #SuryakumarYadav pic.twitter.com/NO1bsSbXAd
— 𝐃𝐢𝐠𝐯𝐢𝐣𝐚𝐲 𝐒𝐢𝐧𝐠𝐡 🇮🇳 (@Knight_riders18) July 4, 2024
Captain Rohit Sharma in Bhangra mood. 😄👏 pic.twitter.com/ibiiN78FpG
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 4, 2024
टीम इंडियाचे खेळाडू आता दिल्लीतील आयटीसी मौर्य या हॉटेलमध्ये काहीवेळ विश्रांती घेतील. त्यानंतर भारतीय खेळाडू साधारण 11च्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटायला जातील. त्यानंतर दुपारी 2 ते 3च्या सुमारास टीम इंडिया मुंबईत दाखल होईल. मुंबईत टीम इंडियाची विजयी यात्रा काढण्यात येणार आहे. टीम इंडिया वानखेडे स्टेडियमवरही जाईल. याठिकाणी भारतीय संघाच्या स्वागतासाठी जंगी सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
बॅग उघडली, ट्रॉफीला एकटक पाहिलं, हसले अन्...
टीम इंडियाचं विमान भारतात दाखल होताच बीसीसीआयने खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये जसप्रीत बुमराह, रोहित शर्मा, विराट कोहली, शिवम दुबे, युझवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा दिसून येत आहे. हे सर्व खेळाडू एक बॅग उघडून विश्वचषकाची ट्रॉफी हातात घेऊन भारतात दाखल झाल्याचा आनंद व्यक्त करताना दिसत आहे. यावेळी सर्व खेळाडूंच्या चेहऱ्यावर हास्य दिसून येत आहे. या व्हिडीओला 'Its Home' असं कॅप्शन देण्यात आले आहे.
टीम इंडियाचे आजचे वेळापत्रक-
सकाळी 10 ते दुपारी 12 पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदीसोबत भेट.
दुपारी 2 वाजता : मुंबईकडे रवाना.
सायंकाळी 5 वाजता : मरिन ड्राइव्हला आगमन,
सायंकाळी 5 वाजता : वानखेडे स्टेडियमच्या दिशेने बस परेड. सायंकाळी ७ वाजल्यापासून: वानखेडे स्टेडियमवर विजयी सोहळा
संबंधित बातम्या:
टीम इंडिया विमानतळापासून हॉटेलमध्ये पोहचेपर्यंत...काय काय घडलं?; पाहा A टू Z माहिती
गळ्यात विजयी मेडल...विराट कोहलीने दिल्ली विमानतळाबाहेर येताच काय केलं?; पाहा Video
हार्दिक पांड्याच्या मागची विघ्नं संपता संपेना; पुन्हा संशायाची पाल चुकचुकली, नेमंक काय घडलं?