एक्स्प्लोर
Political Fireworks: 'विरोधी पक्षात दम नाही, सगळेच लवंगी नेते', Rajesh Kshirsagar यांची टोलेबाजी
कोल्हापुरात दिवाळीचे फटाके खरेदी करताना आमदार राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांनी राजकीय फटाके फोडले, सत्ताधारी आणि विरोधकांना फटाक्यांची उपमा दिली. 'विरोधी पक्षाच्या फटाक्यात तर बिलकुल दम राहीलेला नाही,' असं म्हणत क्षीरसागर यांनी विरोधकांना लक्ष्य केलं. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना 'बॉम्ब' म्हटले, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) सर्वांची काळजी घेणारा 'मोर' संबोधले. भाजपला (BJP) त्यांनी सुगंध देणारे 'फ्लॉवर पॉट' म्हटले आणि शिवसेनेच्या धनुष्यबाणाला आनंद देणारा बाण म्हटले. याउलट, संजय राऊत (Sanjay Raut) यांचा उल्लेख 'पुसका फटाका' असा केला आणि विरोधी पक्षातील नेत्यांना 'लवंगी फटाके' संबोधून, त्यांच्यात कोणीही मोठा नेता नसल्याचा टोला लगावला. महायुतीचे नेते मोठे आणि प्रभावी फटाके आहेत, तर विरोधक फक्त कचरा करणारे छोटे फटाके आहेत, असेही ते म्हणाले.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
महाराष्ट्र
बुलढाणा
Advertisement
Advertisement

















