![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Indian Cricket Team Head Coach: भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी गौतम गंभीरचं नाव निश्चित; कोणी-कोणी अर्ज केलेला?
Gautam Gambhir: बीसीसीआयकडून आयपीएल सुरु असतानाच भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकासाठी अर्ज मागवण्यात आले होते.
![Indian Cricket Team Head Coach: भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी गौतम गंभीरचं नाव निश्चित; कोणी-कोणी अर्ज केलेला? Indian Cricket Team Head Coach Gautam Gambhir The Only Candidate To Apply For Indian Head Coach Post Indian Cricket Team Head Coach: भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी गौतम गंभीरचं नाव निश्चित; कोणी-कोणी अर्ज केलेला?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/18/8012f9798deaa04d23c1842b3cddf53c1718681835891987_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Gautam Gambhir: कोलकाता नाईट रायडर्सचा मेंटर (KKR) आणि माजी भारतीय फलंदाज गौतम गंभीर (Gautam Gambhir) लवकरच भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक (Indian Cricket Team Head Coach) बनणार आहेत. याबाबत महिन्याच्या शेवटी बीसीसीआयकडून मोठी घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. सध्या टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आहे. सधा सुरु असलेल्या 2024 च्या टी 20 विश्वचषकानंतर राहुल द्रविडचा कार्यकाळ संपणार आहे. त्यानंतर भारतीय संघाची जबाबदारी गौतम गंभीरकडे देण्यात येणार आहे.
बीसीसीआयकडून आयपीएल सुरु असतानाच भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकासाठी अर्ज मागवण्यात आले होते. यावेळी अनेक परदेशी माजी खेळाडूंकडून अर्ज केल्याची चर्चा रंगली होती. मात्र याबाबत आता एक नवीन माहिती समोर आली आहे. भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी एकच अर्ज आला होता, तो म्हणजे गौतम गंभीरचा. तसेच या अर्जानंतर गौतम गंभीरने ऑनलाइन मीटिंगद्वारे बीसीसीआयला मुलाखत दिल्याचंही सांगण्यात येत आहे.
GAUTAM GAMBHIR, THE ONLY CANDIDATE TO APPLY FOR INDIAN HEAD COACH POST...!!!
— Johns. (@CricCrazyJohns) June 18, 2024
- The interview will be done today through Zoom Call. [Devendra Pandey from Express Sports] pic.twitter.com/NXtFDJ5hob
गंभीरची अट बीसीसीआयकडून मान्य-
बीसीसीआय आणि गौतम गंभीर यांच्यात एक करार झाला आहे. राहुल द्रविडच्या प्रशिक्षणाखाली, संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये फलंदाजी प्रशिक्षक म्हणून विक्रम राठौर, गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून पारस महांबरे आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून टी. दिलीप यांचा समावेश होता. आता गौतम गंभीर प्रशिक्षण झाल्यानंतर या सगळ्यांना देखील हटवले जाऊ शकते. त्यामुळे गंभीर स्वतः सपोर्ट स्टाफची निवड करणार असल्याचं सांगितलं जात आहे.
नवीन प्रशिक्षकाचा कार्यकाळ किती?
टीम इंडियाच्या नवीन मुख्य प्रशिक्षकाचा कार्यकाळ 1 जुलै 2024 पासून सुरू होईल, जो 31 डिसेंबर 2027 पर्यंत चालेल. नवीन मुख्य प्रशिक्षकाच्या कार्यकाळात, टीम इंडिया एकूण 5 ICC ट्रॉफी खेळणार आहे, ज्यात चॅम्पियन्स ट्रॉफी, T20 विश्वचषक, एकदिवसीय विश्वचषक आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या 2 चषकांचा समावेश आहे.
गौतम गंभीरचं आंतरराष्ट्रीय कारकीर्द-
गौतम गंभीरचं आंतरराष्ट्रीय करियर शानदार राहिलेय. त्यानं टीम इंडियासाठी 147 वनडे सामने खेळले आहेत, त्यामध्ये 5238 धावा केल्या आहेत. वनडेमध्ये गौतम गंभीरने 11 शतके आणि 34 अर्धशतके ठोकली आहेत. गौतम गंभीर टीम इंडियासाठी 58 कसोटी सामने खेळलाय, यामध्ये 4154 धावा केल्या आहेत. कसोटीमध्ये गौतम गंभीरने 9 शतके आणि 22 अर्धशतके ठोकली आहेत. कसोटीमध्ये गौतम गंभीरने द्विशतकही ठोकलेय. गौतम गंभीर याने 37 टी 20 सामनेही खेळले आहेत. यामद्ये 932 धावा केल्या आहेत. त्याने यादरम्यान सात अर्धशतके ठोकली आहेत. 2007 टी20 वर्ल्डकप आणि 2011 वनडे वर्ल्डकप विजयात गौतम गंभीरचाही मोठा वाटा राहिला आहे.
संबंधित बातम्या:
Fastest T20 Hundred: 27 चेंडूत झळकावले शतक, 18 षटकार अन् 6 चौकारांचा पाऊस; ख्रिस गेलचा मोडला विक्रम
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)