Roger Fedrer Retires: 'जेव्हा तुमचे सहकारी तुमच्यासाठी रडतात...' रॉजर फेडररसाठी विराटची भावूक पोस्ट
Virat kohli On Roger Fedrer Retires: स्वित्झर्लंडचा सर्वकालीन महान टेनिसपटू रॉजर फेडरर शुक्रवारी (23 सप्टेंबर 2022) आपल्या कारकिर्दीतील अखेरचा स्पर्धात्मक सामना खेळला.
![Roger Fedrer Retires: 'जेव्हा तुमचे सहकारी तुमच्यासाठी रडतात...' रॉजर फेडररसाठी विराटची भावूक पोस्ट Indian Cricket Team Former Skipper Virat Kohli On Roger Fedrer Retirement Roger Fedrer Retires: 'जेव्हा तुमचे सहकारी तुमच्यासाठी रडतात...' रॉजर फेडररसाठी विराटची भावूक पोस्ट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/24/d32c0b2f216393d2971601ba6ae49def1664018742390266_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Virat kohli On Roger Fedrer Retires: स्वित्झर्लंडचा सर्वकालीन महान टेनिसपटू रॉजर फेडरर शुक्रवारी (23 सप्टेंबर 2022) आपल्या कारकिर्दीतील अखेरचा स्पर्धात्मक सामना खेळला. लेव्हर कपमधील दुहेरीच्या या सामन्यात त्याने राफेल नदालसह भाग नोंदवला होता. सामन्यानंतर फेडररला पाणावलेल्या डोळ्यांनी निरोप घेतला. यावेळी फेडरर-नदाल या दोघांनाही अश्रू अनावर झाले. या दोघांचा इमोशनल व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. याचदरम्यान, भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीनं दोघांसाठी एक खास पोस्ट लिहून रॉजर फेडररला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
विराटनं रॉजर फेडरर आणि राफेल नदाल यांचा सोबत रडतानाचा फोटो पोस्ट केलाय. ज्याच्या कॅप्शनमध्ये विराटनं लिहिलंय की, "कोणी विचार केला असेल की त्याचा प्रतिस्पर्धी खेळाडूच्या मनात त्याच्याविषयी अशाही काही गोष्टी असू शकतात. हेच खेळाचं सौंदर्य आहे. हे मी पाहिलेले आतापर्यंतचा सर्वात सुंदर 'स्पोर्ट्स पिक्चर' आहे. जेव्हा तुमचे सहकारी तुमच्यासाठी रडतात, तेव्हा तुम्ही समजू शकता की देवानं तुम्हाला ही प्रतिभा का दिली आहे?"
विराटची पोस्ट-
फेडररची दुखापतींशी झुंज
41 वर्षीय फेडरर दिर्घकाळापासून दुखापतीशी झुंज देतोय. त्यानं त्याची शेवटची स्पर्धा विम्बल्डन 2021 मध्ये खेळली होती. फेडररनं त्याच्या कारकिर्दीत एकूण 20 ग्रँडस्लॅम विजेतेपदे जिंकली आहेत आणि राफेल नदाल आणि नोव्हाक जोकोविच यांच्यानंतर सर्वाधिक ग्रँडस्लॅम विजेत्यांच्या यादीत तो तिसरा आहे. नदालच्या नावावर 22 तर जोकोविचच्या नावावर 21 विजेतेपद आहेत.
फेडररची इमोशनल पोस्ट
फेडररनं याच महिन्यात निवृत्तीची घोषणा केली होती. तसेच लेव्हर कप त्याच्या कारकिर्दीतील शेवटची स्पर्धा असेल असंही त्यानं स्पष्ट केलं होतं. त्यानं सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिलं होतं की, "मी 24 वर्षाच्या कारकिर्दीत 1500 पेक्षा अधिक सामने खेळले आहेत. आता वेळ आली आहे निरोप घेण्याची." फेडररनं फ्रेंच ओपनमध्ये 21वं ग्रँड स्लॅम जिंकलं, हे त्याच्या टेनिस कारकिर्दीतील अखेरचं ग्रँड स्लॅम ठरलं.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)