IND vs WI, 2nd Test LIVE : भारताने १-० ने मालिका जिंकली
IND vs WI, 2nd Test Live : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यादरम्यान आजपासून (20 जुलै) दुसऱ्या कसोटीला सुरुवात होत आहे.
LIVE
Background
India vs West Indies, Day 1 Live Score : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यादरम्यान आजपासून (20 जुलै) दुसऱ्या कसोटीला सुरुवात होत आहे. त्रिनिदाद येथील पोर्ट ऑफ स्पेनच्या क्वींस पार्क ओवल येथे हा सामना होणार आहे. मालिकेतील दुसरा कसोटी सामना खास असेल.. कारण, भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील हा 100 वा कसोटी सामना आहे. त्याशिवाय विराट कोहलीचा हा 500 आंतरराष्ट्रीय सामना असेल.
वेस्ट इंडिजच्या संघाने पहिल्या कसोटी सामन्यात निराशाजनक कामगिरी केली होती. आता दुसऱ्या कसोटी सामन्यात विडिंज खेळ उंचावण्याचा प्रयत्न करेल. पहिल्या कसोटी सामन्यात भारताने विजय मिळवला होता. फलंदाज आणि गोलंदाजांनी दमदार प्रदर्शन केले होते. तीन दिवसांमध्ये भारताने सामन्यात बाजी मारली होती. हा सामना भारताने एक डाव आणि 141 धावांनी जिंकला होता. आता दुसऱ्या कसोटी सामना जिंकून क्लिन स्वीप देण्याच्या इराद्याने भारत मैदानात उतरले तर वेस्ट इंडिजचा संघ परतफेड करण्यासाठी खेळेल. पहिल्या कसोटी सामन्यात यशस्वी जयस्वाल याने दीडशतकी खेळी केली होती. त्याशिवाय कर्णधार रोहित शर्मा याने शतक तर विराट कोहलीने अर्धशतक झळकावले होते. गोलंदाजीत अश्विन याने 12 विकेट घेतल्या होत्या. तर रविंद्र जाडेजा यानेही भेदक मारा केला होता.
हेड टू हेड रिकॉर्ड
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये आतापर्यंत 99 सामने झाले आहेत. यामध्ये वेस्ट इंडिजने 30 सामन्यात बाजी मारली आहे तर भारताला 23 सामन्यात विजय मिळाला आहे. 46 सामने अनिर्णित राहिले आहेत.
संभावित प्लेइंग 11
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, इशान किशन (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जयदेव उनादकट, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी.
वेस्ट इंडिज – क्रेग ब्रेथवेट (कर्णधार), तेगनारायण चंद्रपॉल, क्रिक मॅकेंजी, अलीक अथानाजे, जर्मेन ब्लॅकवूड, जोसुआ डी सिल्वा (विकेटकीपर), जेसन होल्डर, केविन सिंक्लेयर, अल्जारी जोसेफ, केमार रोच, शैनन गॅब्रियल.
कधी आणि कुठे पाहाल सामना ?
दुसरा कसोटी सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसात वाजता सुरु होणार आहे. डीडी स्पोर्टस चॅनलवर लाईव्ह सामना पाहता येणार आहे. जिओ अॅपवर मोफत लाईव्ह स्ट्रिमिंग असेल. त्याशिवाय एबीपी माझाच्या संकेतस्थळावर सामन्याबाबतचे अपडेट मिळतील.
पिच रिपोर्ट
विराट कोहलीचा 500 वा आंतरराष्ट्रीय सामना -
भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीने आतापर्यंत 499 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. आज होणारा सामना विराट कोहलीचा 500 वा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना असेल. इतके सामने खेळणारा विराट कोहली दहावा खेळाडू होणार आहे. भारताचा माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर सर्वाधिक सामने खेळला आह. सचिन तेंडुलकरने 664 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
विराट कोहलीने आतापर्यंत 499 सामन्यातील 558 डावात फलंदाजी करताना 53.48 जबरदस्त सरासरीने 25461 धावा केल्या आहेत. विराट कोहलीच्या नावावर 75 शतके आणि 131 अर्धशतके आहेत. विराट कोहलीची सर्वोच्च धावसंख्या 254* इतकी आहे.
सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्या खेळाडूंची यादी -
सचिन तेंडुलकर- 664 सामने.
महेला जयवर्धने- 652 सामने.
कुमार संगाकारा- 594 सामने.
सनथ जयसूर्या- 586 सामने.
रिकी पाँटिंग- 560 सामने.
महेंद्र सिंह धोनी- 538 सामने.
शाहिद आफ्रिदी - 524 सामने
जॅक कॅलिस- 519 सामने.
राहुल द्रविड- 509 सामने
इंजमाम उल हक- 500 सामने.
विराट कोहली- 499 सामने
भारताने १-० ने मालिका जिंकली
𝗨𝗣𝗗𝗔𝗧𝗘
— BCCI (@BCCI) July 24, 2023
The rain plays spoilsport as the Play is Called Off on Day 5 in the second #WIvIND Test! #TeamIndia win the series 1-0! 👏 👏 pic.twitter.com/VKevmxetgF
पावसामुळे दुसरा कसोटी सामना अनिर्णित
पावसामुळे दुसरा कसोटी सामना अनिर्णित....
दुसऱ्या सत्राचा खेळही वाया जाण्याची शक्यता
The wait continues! ⌛️
— BCCI (@BCCI) July 24, 2023
The drizzle is back & so are the covers! #TeamIndia | #WIvIND pic.twitter.com/ihxDItABsp
पुन्हा पावसाचा व्यत्यय
Day 5 was going to resume at 10.45 pm
— Johns. (@CricCrazyJohns) July 24, 2023
Rain came, delayed.
Then rain stopped and Play was going to start at 11.10 pm
Rain is back again. pic.twitter.com/1Tq7wJfcHT
पोर्ट ऑफ स्पेनच्या मैदानात पुन्हा पावसाची हजेरी
पोर्ट ऑफ स्पेनच्या मैदानात पुन्हा पावसाची हजेरी