यशस्वी जायस्वाल -ईशान किशन यांचं कसोटी पदार्पण, वेस्ट इंडिजची प्रथम फलंदाजी
Yashasvi-Ishan Test Debut : वेस्ट इंडिजचा कर्णधार क्रैग ब्रॅथवेट याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
Yashasvi-Ishan Test Debut : वेस्ट इंडिजचा कर्णधार क्रैग ब्रॅथवेट याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघ प्रथम गोलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. भारतीय संघात दोन जणांना पदार्पणाची संधी मिळाली आहे. यशस्वी जायस्वाल आणि ईशान किशान यांचे पदार्पण झालेय. भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने यशस्वी जायस्वाल आणि ईशान किशन यांना टेस्ट कॅप दिली.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमधील पराभवाला मागे टाकत भारतीय संघ पुन्हा मैदानात उतरला आहे. वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या तिसऱ्या पर्वाची सुरुवात भारत आणि वेस्ट इंडिजचा संघ करणार आहे. यशस्वी जायस्वाल आणि ईशान किशन यासारख्या युवा खेळाडूंना संधी देऊन संघ बांधणीस भारताने सुरुवात केली आहे. नवे खेळाडू वेस्ट इंडिजमध्ये कशी कामगिरी करतात, हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.
दुसरीकडे विश्वचषकातून गाशा गुंडाळल्यामुळे वेस्ट इंडिजवर टीकेची झोड उडाली आहे. विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच वेस्ट इंडिजचा संघ खेळत नाही, त्यामुळे चाहत्यांची निराशा झाली. त्यामुळे भारताविरोधात वेस्ट इंडिजचा संघ आक्रमकपणे उतरेल. क्रैग ब्रॅथवेटच्या नेतृत्वातील वेस्ट इंडिजचा संघ भारतीय संघाला आव्हान देणार आहे. घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजला पराभूत करणं, तितके सोपं नाही. कागदावर भारताचा संघ मजबूत वाटत असला तरी घरच्या खेळपट्टयावर विडिंजचा संघ विजय मिळवू शकतो.
Congratulations to Yashasvi Jaiswal and Ishan Kishan who are all set to make their Test debut for #TeamIndia.
— BCCI (@BCCI) July 12, 2023
Go well, lads!#WIvIND pic.twitter.com/h2lIvgU6Zp
IND vs WI प्लेइंग XI:
भारतीय संघ - : रोहित शर्मा (कर्णधार),यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रविंद्र जाडेजा, ईशान किशन (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकुर, जयदेव उनादकट, मोहम्मद सिराज
वेस्ट इंडीज : क्रैग ब्रॅथवेट (कर्णधार), चंद्रपॉल, रेमन रीफर, रहकीम कॉर्नवाल, जर्मेन ब्लॅकवूड, एलिक अथानाजे, जोशुआ डा सिल्वा (विकेटकीपर), जेसन होल्डर, अल्जारी जोसेफ, केमार रोच, जोमेल वारिकन
हेड टू हेड -
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आतापर्यंत 98 कसोटी सामने झाले आहेत. यामध्ये भारतीय संघाने 22 सामन्यात विजय मिळवलाय. तर 30 सामने वेस्ट इंडिजने जिंकलेत. 46 सामने अनिर्णित राहिलेत. 2002 पासून भारताने वेस्ट इंडिजविरोधात एकही कसोटी मालिका गमावलेली नाही.