एक्स्प्लोर

IND vs WI : पुजाराची जागा कोण घेणार ? तिसऱ्या क्रमांकासाठी या पाच नावांची चर्चा

India vs West Indies 1st Test :  भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये बुधवारपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे.

India vs West Indies 1st Test :  भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये बुधवारपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. वेस्ट इंडिजविरोधात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला कोण उतरणार ? हा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून उपस्थित केला जातोय. कारण, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये निराशाजनक कामगिरी करणाऱ्या चेतेश्वर पुजाराला कसोटीमध्ये डच्चू मिळाला. वेस्ट इंडिज दौऱ्यात चेतेश्वर पुजाराला संघात स्थान मिळाले नाही. भारतीय संघात अनेक युवा खेळाडूंना संघात स्थान देण्यात आलेय. चेतेश्वर पुजाराच्या अनुपस्थितीत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला कोण उतरणार ? याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. तिसऱ्या क्रमांकासाठी पाच नावे चर्चेत आहेत, पाहूयात त्या पाच खेळाडूंबाबत 

चेतेश्वर पुजारा कसोटीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरतो. आता त्याच्या अनुपस्थितीत टीम इंडियात कुणाला संधी मिळते याकडे क्रीडा चाहत्यांचे लक्ष लागलेय. पाच नावे सर्वाधिक चर्चेत आहे. त्यामध्ये सर्वात आघाडीवर नाव यशस्वी जायस्वाल याचे आहे. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांच्या उपस्थितीत यशस्वी जायस्वाल याला डावाची सुरुवात करता येणार नाही. त्याला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवले जाऊ शकते. ईराणी चषकात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने शतके झळकावली आहेत. 

ऋतुराज गायकवाडला तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याचा अनुभव- 
 
दमदार फलंदाजी करणारा ऋतुराज गायकवाड यालाही तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळू शकते. रेड बॉल क्रिकेटमध्ये गायकवाड तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी रतो. गायकवाडकडे प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सहा शतकांची नोंद आहे. 

अनुभवी खेळाडू तिसऱ्या क्रमांकावर उतरणार ?
यशस्वी जायस्वाल आणि ऋतुराज गायकवाड यांच्याशिवाय शुभमन गिल यालाही तिसऱ्या क्रमांकावर खेळवले जाऊ शकते. रोहित शर्मा आणि यशस्वी जायस्वाल यांनी डावाची सुरुवात केल्यास तिसऱ्या क्रमांकवर शुभमन गिल याला खेळवले जाऊ शकते. शुभमन गिल याच्याकडे नव्या आणि जुन्या चेंडूवर खेळण्याचा तगडा अनुभव आहे. शुभमन गिल याच्याशिवाय अनुभवी विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे हे दोन पर्यायही टीम इंडियाकडे आहेत. विराट कोहलीकडे तिसऱ्या क्रमाकंवार फलंदाजी करण्याचा तगडा अनुभव आहे. 

वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी कसोटी संघ 
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड़, विराट कोहली, यशस्वी जयसवाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भरत (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनादकट, नवदीप सैनी.

12 जुलैपासून विंडीजचा दौरा

टीम इंडिया वेस्ट इंडिज दौऱ्यावर पहिले दोन कसोटी सामने खेळणार आहे. पहिला कसोटी सामना 12 जुलैपासून डॉमिनिका येथे खेळवला जाणार आहे. यानंतर दुसरा कसोटी सामना 20 जुलैपासून पोर्ट ऑफ स्पेन येथे होणार आहे. तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका 27 जुलैपासून सुरू होणार आहे, तर पाच सामन्यांची टी-20 मालिका 3 ऑगस्टपासून होणार आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Prakash Ambedkar : फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
Govinda Gun Fire: गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
Dharmaveer 2: बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Govinda Gun Fire : कोलकात्याला जाण्यासाठी बॅगेत बंदूक भरताना मिसफायरShinde Group Dasara Melava : शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसीमध्ये होणारDevendra Fadnavis : लव्ह जिहादच्या तब्बल एक लाखांपेक्षा जास्त तक्रारी - देवेंद्र फडणवीसTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2PM : 1 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Prakash Ambedkar : फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
Govinda Gun Fire: गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
Dharmaveer 2: बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
अमेरिका-चीननंतर 2050 पर्यंत 'हा' देश सुपरपॉवर, चांगले संबंध ठेवा, ब्रिटनच्या माजी पंतप्रधानांनी कोणत्या देशाचं नाव घेतलं? भारत की पाकिस्तान? 
भारतासोबत चांगले संबंध ठेवा, 2050 पर्यंत सुपरपॉवर देशांच्या यादीत केवळ 3 देश असणार, टोनी ब्लेअर काय म्हणाले?
Jayant Patil: जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
Mumbai Accident: मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, बाबांसोबत शाळेला निघालेल्या चिमुकलीचा मृत्यू, जखमी बाप मृतदेह मांडीवर घेऊन भ्रमिष्टासारखा बसून राहिला
मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, लेकीने बाबाच्या मांडीवरच प्राण सोडले, वडील भ्रमिष्टासारखे रस्त्यावरच बसून राहिले
शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार
शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार
Embed widget