(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs AUS : भारत आणि आफ्रिका यांच्यात बॉक्सिंग डे कसोटी, A टू Z माहिती
India vs South Africa Test Series Schedule : टी 20 आणि वनडे मालिकेनंतर भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ कसोटी सामन्यासाठी मैदानात उतरणार आहेत. 26 डिसेंबर पासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे.
India vs South Africa Test Series Schedule : टी 20 आणि वनडे मालिकेनंतर भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) संघ कसोटी सामन्यासाठी मैदानात उतरणार आहेत. 26 डिसेंबर पासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. मालिकेलातील पहिलाच सामना ऐतिहासिक असेल. 26 डिसेंबर रोजी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु होणारा सामना बॉक्सिंग डे कसोटी सामना म्हटले जाते.
सूर्यकुमार यादव टी-20 मालिकेत टीम इंडियाचा कर्णधार होता. तर वनडे मालिकात केएल राहुल यांनी टीम इंडियाचे नेतृत्व केले होते. आता कसोटी मालिकेत संघाची धुरा रोहित शर्माच्या हाती आहे. रोहित शर्मासोबत विराट कोहली, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह हे दिग्गजही कसोटी मालिकेसाठी संघात पुनरागमन करणार आहेत.
भारत आणि आफ्रिका बॉक्सिंग डे -
भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन संघामध्ये 1992 मध्ये पहिल्यांदा बॉक्सिंग डे कसोटी सामना झाला होता. आतापर्यंत दोन्ही संघांनी 6 बॉक्सिंग डे कसोटी खेळल्या आहेत. ज्यामध्ये टीम इंडियाला फक्त दोन सामन्यात विजय मिळवता आलाय. तर आफ्रिकेने चार सामन्यात बाजी मारली आहे. 2021 मध्ये बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 113 धावांनी पराभव केला. त्याआधी 2010 मध्ये भारताने बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 87 धावांनी पराभव केला होता.
कधी सामना ?
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना 26 डिसेंबर ते 30 डिसेंबर या कालावधीत सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट पार्क या मैदानात येथे खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार, दुपारी 1.30 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. यानंतर दुसरा कसोटी सामना 3 जानेवारी ते 7 जानेवारी दरम्यान न्यूलँड्स, केपटाऊन येथे खेळवला जाईल. हा कसोटी सामना भारतीय वेळेनुसार दुपारी दोन वाजता सुरू होणार आहे.
लाइव्ह स्ट्रिमिंग -
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणारा कसोटी सामना टिव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल. त्याशिवाय मोबाईलवर सामना पाहणाऱ्या प्रेक्षकांना डिस्नेप्लस हॉटस्टारवरही सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येणार आहे.
कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया -
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, यशस्वी जायसवाल, अभिमन्यू ईश्वरन, रवि अश्विन, रवींद्र जडेजा, केएल राहुल, केएस भरत, शार्दुल ठाकुर, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा.
आफ्रिकेचा संघ -
टेंबा बावुमा (कर्णधार), टोनी डी जोर्जी, डीन एल्गर, एडन मार्करम, कीगन पीटरसन, मार्को यानसेन, वियान मुल्डर, डेविड बेडिंघम, ट्रेस्टन स्टब्स, काइल वॅरेनी, नांद्रे बर्गर, गेराल्ड कोएत्जी, केशव महाराज, लुंगी नगिदी आणि कगिसो रबाडा.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात बॉक्सिंग डे कसोटी
1992 - दक्षिण आफ्रिका vs भारत (पोर्ट एलिजाबेथ) - दक्षिण आफ्रिकाने 9 विकेटने जिंकला
1996 - दक्षिण आफ्रिका vs भारत (डरबन) - दक्षिण आफ्रिकाने 328 धावांनी विजय मिळवला.
2006 - दक्षिण आफ्रिका vs भारत (डरबन) - दक्षिण आफ्रिकाने 174 धावांनी जिंकला.
2010 - दक्षिण आफ्रिका vs भारत (डरबन) - भारताने 87 धावांनी सामना जिंकला.
2013 - दक्षिण आफ्रिका vs भारत (डरबन) - दक्षिण आफ्रिकाने 10 विकेटने सामना जिंकला
2021 - दक्षिण आफ्रिका vs भारत (सेंचुरियन) - भारताने 113 धावांनी सामना जिंकला.