Ind vs SA, 1st ODI Highlights : भारताची गोलंदाजीसह फलंदाजीत सुमार कामगिरी, सामना 31 धावांनी गमावला
IND vs SA Live : के. एल. राहुलच्या नेतृत्वात भारतीय संघ दक्षिण आफ्रिका विरोधात एकदिवसीय मालिकेची सुरुवात करत आहे. पाहा पहिल्या एकदिवसीय सामन्याचे लाईव्ह अपडेट्स ...
एकदिवसीय मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा धक्का बसला आहे. विराट कोहली, शिखर धवन आणि शार्दुल ठाकूर यांचा अपवाद वगळता भारतीय फलंदाजांना आपली कामगिरी करण्यात अपयश आलेय. पहिल्या एकदिवसीय सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिका संघाने भारताचा 31 धावांनी पराभव केला. दक्षिण आफ्रिका संघाने दिलेल्या 297 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाला 50 षटकांत आठ बाद 265 धावा करता आल्या. विराट कोहली आणि शिखर धवन यांनी भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण लागोपाठ विकेट पडल्यामुळे भारताचा डाव गडगडला.
भारताने आधी गोलंदाजीत सुमार कामगिरी केल्यानंतर फलंदाजीतही चांगल्या सुरुवातीनंतर खराब शेवट केल्यामुळे सामना गमवला आहे. भारताचा 31 धावांनी पराभव झाला आहे.
व्यंकेटश अय्यर बाद, भारताला सहवा धक्का... सामना दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने झुकला आहे.
भारताचा अर्धा संघ तंबूत परतला आहे. श्रेयस अय्यर पाठोपाठ पंतही बाद झाला. भारतीय संघाची सर्व मदार युवा वेंकटेश अय्यरच्या खांद्यावर. भारतीय संघाला विजयासाठी १०० पेक्षा जास्त धावांची गरज
मोक्याच्या क्षणी भारतीय फलंदाजांनी विकेट फेकल्यामुळे डाव गडगडला. धवन, विराटनंतर श्रेयस अय्यरही बाद झाला आहे. अय्यरला १७ धावांवर समाधान मानावे लागले.
शिखर धवन पाठोपाठ विराट कोहलीही तंबूत परतला आहे. तरबेज शम्सीने विराट कोहलीला ५१ धावांवर केलं बाद
विराट कोहलीने संयमी अर्धशतकी खेळी केली. ६० चेंडूचा सामना करताना विराट कोहलीने अर्धशतक साजरे केलं. विराट कोहलीचे हे ६३ वे अर्धशतक आहे.
भारतीय संघाला दुसरा धक्का बसला आहे, शिखर धवन ७९ धावांवर बाद झाला
शिखर धवन आणि विराट कोहली यांनी भारताचा डाव सावरला आहे. १८ षटकानंतर भारताच्या १०० धावा पूर्ण झाल्या आहेत. धवन ६४ तर विराट २४ धावांवर खेळत आहे. भारतीय संघाला विजयासाठी १९७ धावांची गरज आहे.
भारतीय संघात पुनरागमन करणाऱ्या शिखर धवनने दमदार अर्धशतकी खेळी केली आहे. शिखर धवनने ५१ चेंडूत अर्धशतक झळकावले.
दहा षटकानंतर भारतीय संघाने एक बाद ५५ धावा केल्या आहेत. शिखर धवन आणि विराट कोहली खेळत आहे. राहुल १२ धावांवर बात झाला.
भारतीय संघाला पहिला धक्का बसला आहे. मार्करम याने कर्णधार केएल. राहुलला १२ धावांवर बाद केलं.
दक्षिण आफ्रिका संघाने दिलेल्या २९७ धावांचा पाठलाग करताना राहलु-शिखर यांनी सावध सुरुवात केली आहे. पहिल्या पाच षटकांत भारताने बिनबाद २४ धावा केल्या आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी घेतलेल्या आफ्रिकेची सुरुवात खास झाली नाही. पण नंतर कर्णधर बवुमा आणि डुसेन यांनी अप्रतिम शतकं झळकावत संघाचा डाव सावरला. ज्यामुळे आफ्रिकेने 50 षटकांत 296 धावा केल्या असून भारताला विजयासाठी 297 धावांची गरज आहे.
बवूमाला बाद करत बुमराहने भागिदारी तोडली, बवूमाने १४३ चेंडूत ११० धावा केल्या.
कर्णधार बवूमा याने मोक्याच्या क्षणी शतकी खेळी करत दक्षिण आफ्रिका संघाचा डाव सावरला. १३३ चेंडूत बवूमाने शतकी खेळी केली.
रुसी व्हॅन डर डुसेन आणि कर्णधार बवूमा यांच्या भागिदारीच्या जोरावर दक्षिण आफ्रिका संघाने २०० धावांचा टप्पा पार केला आहे. वबूमा ८४ तर व्हॅन डर डुसेन ६५ धावांवर खेळत आहेत. अद्याप १२ षटकांचा खेळ बाकी आहे.
रुसी व्हॅन डर डुसेन आणि कर्णधार बवूमा दक्षिण आफ्रिकेचा डाव सावरला आहे. दोघांनीही मोक्याच्या क्षणी १०० धावांची भागिदारी केली आहे.
रुसी व्हॅन डर डुसेन आणि कर्णधार बवूमा यांनी सावरला दक्षिण आफ्रिकेचा डाव... ३० षटकानंतर दक्षिण आफ्रिका तीन बाद १५० धावा...
कर्णधार टेम्बा बवूमा याने दक्षिण आफ्रिकेचा डाव सावरला आहे. अर्धशतकी खेळी करत संघाचा डाव सावरला. ७६ चेंडूचा सामना करताना ५० धावांची खेळी केली आहे.
यजमान दक्षिण आफ्रिका संघाने तीन गड्यांच्या मोबदल्यात १०० धावा पूर्ण केल्या आहेत.
पदार्पण करणाऱ्या वेंकटेश अय्यर याने धोकादायक मार्करमला धावबाद केलं. मार्करम फक्त चार धावा करुन माघारी परतला. १७.४ षटकांत दक्षिण आफ्रिकाने तीन बाद ६८ धावा केल्या आहेत.
अश्विनने डि कॉकचा अडथळा केला दूर. डि कॉकने २७ धावांची केली खेळी... १५ षटकानंतर दक्षिम आफ्रिकाने दोन बाद ५८ धावा केल्या आहेत.
10 षटकानंतर दक्षिण आफ्रिका संघाने एक बाद ३९ धावा केल्या आहेत. बुमराहने मलानचा बळी घेत भारतीय संघाला चांगली सुरुवात करुन दिली आहे. डि कॉक आणि बवूमा संध्या मैदानावर आहेत.
वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने भारताला पहिले यश मिळवून दिले. बुमराहने सलामीवीर मलानला पाठवले माघारी.. सहा षटकानंतर दक्षिण आफ्रिका एक बाद २५ धावा
पार्श्वभूमी
IND vs SA : के. एल. राहुलच्या नेतृत्वात भारतीय संघ दक्षिण आफ्रिका विरोधात एकदिवसीय मालिकेची सुरुवात करत आहे. पार्ल स्टेडिअमवर भारत आणि दक्षिण आफ्रिाक यांच्यात पहिला एकदिवसीय सामना होत आहे. कसोटी मालिकेत भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. या पराभवाचा वचपा काढण्याच्या इराद्याने भारतीय संघ मैदानावर उतरेल. (IND vs SA, 1st ODI )
पार्लच्या मैदानावर भारताची कामगिरी -
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना पार्ल क्रिकेट ग्राऊंडवर होत आहे. या मैदानावर भारताने पहिला सामना 1997 मध्ये खेळला होता. हा सामना बरोबरीत सुटला होता. 2001 मध्ये भारताने केनियाला हरवले होतं. तर 2003 मध्ये नेदरलँडचा पराभव केला होता. या मैदानावर भारताने आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत. या तिन्ही सामन्यात भारतीय संघ अजेय आहे. आपला हा विक्रम भारतीय संघ कायम राखतो का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
दोन्ही संघ कसे आहेत?
भारतीय संघ -
केएल राहुल (कप्तान), शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, वेंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, आर. अश्विन, शार्दुल ठाकूर
दक्षिण आफ्रिका -
क्विंटन डिकॉक, जानेमन मलान, एडन मार्कराम, रुसी व्हॅन डर डुसेन , टेंबा बावुमा (कर्णधार), डेव्हिड मिलर, अँडिले फेहलुकवायो, मार्को जानसेन, केशव महाराज, तबरेझ शम्सी, लुंगी एनगिडी
भारत तब्बल तीन वर्षानंतर दक्षिण आफ्रिकेचा दौरा केलाय. यापूर्वी, भारतानं 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता. दरम्यान, भारत- दक्षिण आफ्रिकेतील एकदिवसीय मालिकेच्या वेळापत्रकावर एकदा नजर टाकुयात. तसेच हे सामने कधी, कुठे खेळले जाणार आहेत?
भारत- दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक
पहिला एकदिवसीय सामना- 19 जानेवारी (बोलंड पार्क, पार्ल)
दुसरा एकदिवसीय सामना- 21 जानेवारी (बोलंड पार्क, पार्ल)
तिसरा एकदिवसीय सामना- 23 जानेवारी (न्यू लँड्स क्रिकेट ग्राऊंड, केपटाऊन)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -