IND vs SA 1st T20I Live updates : दक्षिण आफ्रिकेचा भारतावर सात गड्यांनी विजय, ईशान किशनचं अर्धशतक व्यर्थ
India vs South Africa 1st T20I Live updates : भारत आणि द. अफ्रिका संघामध्ये यंदाची ही अखेरची टी20 मालिका आहे. त्यामुळे टी 20 विश्वचषकासाठी संघ बांधणी करण्याच्या दृष्टीने ही मालिका महत्वाची आहे.
LIVE
Background
India vs South Africa : भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यामध्ये आजापासून पाच सामन्याच्या टी 20 मालिकेला सुरुवात होणार आहे. दोन्ही संघासाठी ही यंदाची अखेरची टी 20 मालिका आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 विश्वचषकासाठी संघ बांधणी करण्याच्या दृष्टीने ही मालिका महत्वाची आहे. टी 20 मालिका सुरु होण्याआधीच भारतीय संघाला दोन मोठे धक्के बसले आहेत. कर्णधार केएल राहुल आणि फिरकीपटू केएल राहुल दुखापतीमुळे संघाबाहेर गेले आहेत. राहुलच्या अनुपस्थितीत ऋषभ पंतकडे संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. तर हार्दिक पांड्या उपकर्णधार असेल. आयपीएल 2022 मध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या अर्शदीप सिंह आणि उमरान मलिक यांच्याशिवाय दिनेश कार्तिकला संधी देण्यात आली आहे. या खेळाडूंना प्लेईंग 11 मध्ये संधी मिळणार का? हे संध्याकाळी नाणेफेकीनंतरच समजणार आहे.
दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेचा संघ पुन्हा एकदा भारताला क्लीन स्वीप करण्याच्या इराद्याने मैदानावर उतरेल. 2022 च्या सुरुवातीला घरच्या मैदानावर आफ्रिकाने भारताचा पराभव केला होता. टेम्बा बावुमाच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेचा संघ मैदानात उतरणार आहे. वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्खियाचं संघात पुनरागमन झालेय. त्याशिवा कगिसो रबाडाचा भेदक माराही असणार आहे. तसेच आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करणारा क्विंटन डिकॉक आणि डेविड मिलर यांच्यावर आफ्रिकेच्या फलंदाजीची भिस्त असेल.
रोहित आणि राहुलच्या अनुपस्थितीत पंतकडे भारतीय संघाचं नेतृत्व आलेय. आंतरराष्ट्रीय सामन्यात पंतला नेतृत्व करण्याचा अनुभव नाही. पण आयपीएलमध्ये दिल्ली संघाचं नेतृत्व सांभाळण्याचा अनुभव पंतच्या पाठीशी आहे. आयपीएल 2022 मध्ये दिल्ली गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर होती. तर 2021 मध्ये दिल्ली क्वालिफायर सामना खेळली होती. धोनीचा वारसा चालवण्याचा पंत नक्कीच प्रयत्न करेल. धोनीप्रमाणेच पंतही खेळाडूंना सपोर्ट करत असल्याचं म्हटलेय जातेय. फलंदाजीत क्विंटन डिकॉक धावांचा पाऊस पाडू शकतो. नुकत्याच झालेल्या आयपीएलमध्ये डिकॉकने 508 धावांचा पाऊस पाडलाय. तर ईशान किशन भारताकडून सलामीला उतरणार आहे. ईशान किशन मोठी खेळी करु शकतो. त्याशिवाय श्रेयस अय्यर आणि हार्दिक पांड्या यांच्याकडूनही मोठ्या खेळीची आपेक्षा आहे. तर दक्षिण आफ्रिकाकडून डेविड मिलर विस्फोटक खेळी करु शकतो.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका Head to Head
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत 15 टी-20 सामने खेळले गेले. यापैकी नऊ सामन्यात भारतानं बाजी मारली आहे. तर, दक्षिण आफ्रिकेच्या संघाला सहा सामन्यावर ठसा उमठवता आला आहे. परंतु, भारतीय दौऱ्यावर दक्षिण आफ्रिकेच्या संघाच पारडं जड दिसलं. भारतात दक्षिण आफ्रिकेनं आतापर्यंत चार सामने खेळले आहेत. त्यापैकी तीन सामने जिंकले आहेत. तर, फक्त एकच सामना गमावला आहे. याआधी 2019 मध्ये पहिल्यांदाच टी-20 मालिका खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात आला होता. त्यावेळी तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यात आली होती. परंतु, पावसामुळं या मालिकेतील पहिला सामना रद्द झाला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारतानं दमदार प्रदर्शना करत सामना जिंकला. तर, तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं विजय मिळवला.
मिलर-डुसेनची वादळी अर्धशतकं, दक्षिण आफ्रिकेचा भारतावर सात गड्यांनी विजय, ईशान किशनचं अर्धशतक व्यर्थ
मिलर-डुसेनची वादळी अर्धशतकं, दक्षिण आफ्रिकेचा भारतावर सात गड्यांनी विजय, ईशान किशनचं अर्धशतक व्यर्थ
9 चेंडूत 11 धावांची गरज
9 चेंडूत 11 धावांची गरज
मिलर-डुसेनची वादळी खेळी, सामना रोमांचक स्थितीत
डेविड मिलर आणि रासी वॅन डुसेन यांच्या वादळी खेळीने सामना रोमांचक स्थितीत पोहचलाय. आफ्रिकेला विजयासाठी 20 चेंडूत 40 धावांची गरज
दक्षिण आफ्रिेकेला तिसरा धक्का, डी कॉक बाद
डिकॉकच्या रुपाने दक्षिण आफ्रिकेला तिसरा धक्का बसलाय. डी कॉकला 22 धावांवर अक्षर पटेलने बाद केले
दक्षिण आफ्रिकेला दुसरा धक्का, हर्षल पटेलने प्रिटोरिअसला केले बाद
दक्षिण आफ्रिकेला दुसरा धक्का, हर्षल पटेलने प्रिटोरिअसला केले बाद