IND-C vs PAK-C :वर्ल्ड चॅम्पियन्स ऑफ लिजेंड्स लीगच्या फायनलमध्ये भारत पाकिस्तान आमने सामने, युवराज सिंग पराभवाचा बदला घेणार?
IND-C vs PAK-C : आज वर्ल्ड चॅम्पियन्स ऑफ लिजेंडस लीगच्या फायनलमध्ये भारत आणि पाकिस्तान आमने सामने येणार आहेत.
बर्मिंघम : वर्ल्ड चॅम्पियन्स ऑफ लिजेंडस लीगच्या (World Championship of Legends League) अंतिम फेरीत भारत आणि पाकिस्तान (IND-C vs PAK-C) आमने सामने येणार आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेले खेळाडू या लीगमध्ये खेळत आहेत. भारताचं नेतृत्व युवराज सिंग करत आहे. पाकिस्ताननं उपांत्य फेरीत वेस्ट इंडिजचा पराभव केला.तर, भारतानं ऑस्ट्रेलियाचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. लीग स्टेजमध्ये पाकिस्ताननं भारताला पराभूत केलं होतं. या पराभवाचा बदला घेण्याच्या इराद्यानं युवराज सिंग आणि टीम मैदानात उतरेल. आज रात्री 9 वाजता ही मॅच सुरु होईल.
भारतानं ग्रुप राऊंड मध्ये केवळ दोन मॅचेसमध्ये विजय मिळवला होता. तर, पाकिस्ताननं पाच पैकी चार सामन्यांमध्ये विजय मिळवला होता. भारत आणि पाकिस्तानचे लिजेंडस आज आमने सामने आलेले पाहायला मिळतील.
भारत पराभवाचा बदला घेणार ?
भारत आणि पाकिस्तान यांच्यात ग्रुप स्टेजमध्ये एक मॅच झाली होती. त्या मॅचमध्ये पाकिस्ताननं भारताला 68 धावांनी पराभूत केलं होतं. कामरान अकमल, शरजील खान आणि मकसूद या तिघांनी अर्धशतकं केली होी. पाकिस्ताननं 20 ओव्हरमध्ये 243 धावा केल्या होत्या. भारताचा संघ या धावांचा पाठलाग करताना 175 धावा करु शकला होता. सुरेश रैनानं त्यावेळी 52 धावांची खेळी केली होती. भारतीय संघ आज त्या पराभवाचा बदला घेण्याच्या इराद्यानं मैदानात उतरेल. भारताला पाकिस्तानवर विजय मिळवायचा असल्यास फलंदाजांना दमदार कामगिरी करावी लागेल. रॉबिन उथप्पा, युवराज सिंग, सुरेश रैना, इरफान पठाण, युसूफ पठाण यांच्यावर दमदार फलंदाजी करण्याची जबाबदारी असेल.
मॅच कधी कुठे होणार?
वर्ल्ड चॅम्पियन्स ऑफ लिजेंडस लीगची फायनल बर्मिंघममध्ये होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार 13 जुले रोजी रात्री 9 वाजता ही मॅच सुरु होईल. भारतात ही मॅच स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्टस 1 एचडी , स्टार स्पोर्ट्स 1 हिंदी वर लाईव्ह पाहता येईल. फॅनकोड च्या अॅप आणि वेबसाईटवर देखील ही मॅच पाहता येणार आहे.
भारतानं ऑस्ट्रेलियाला पराभूत करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. ऑस्ट्रेलियापुढं विजयासाठी 255 धावांचं आव्हान ठेवण्यात आलं होतं. मात्र, ऑस्ट्रेलियाचा संघ 7 विकेटवर 168 धावा करु शकला. युवराज सिंग,रॉबिन उथप्पा, इरफान पठाण आणि युसूफ पठाण यांच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताना 254 धावा केल्या. भारताच्या गोलंदाजांनी केलेल्या कामगिरीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला 168 धावांवर रोखण्यात यश आलं.
संबंधित बातम्या :