(Source: ECI/ABP News/ABP Majha)
प्रिन्स इज बॅक! पाकिस्तानविरोधात शुभमन गिल खेळणार, रोहित शर्माकडून 99 टक्के हमी
Rohit Sharma : पाकिस्तानविरोधातील सामन्यासाठी शुभमन गिल उपलब्ध असल्याची माहिती कर्णधार रोहित शर्मा याने दिली आहे. शुभमन गिल 99 टक्के खेळण्यास तयार असल्याचे कर्णधार रोहित शर्मा याने सांगितले.
ICC Cricket World Cup 2023 : पाकिस्तानविरोधातील सामन्यापूर्वीच भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी दिलासादायक वृत्त समोर आले आहे. युवा सलामी फलंदाज शुभमन गिल (Shubman Gill Health update ) शनिवारी सामन्यासाठी तंदुरुस्त झाला आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने शुभमन गिल याच्या प्रकृतीबाबत महत्वाची अपडेट दिली आहे.
पाकिस्तानविरोधातील सामन्यासाठी शुभमन गिल 99 टक्के तयार असल्याचे रोहित शर्मा याने सांगितले. पाकिस्तानविरोधातील महामुकाबल्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये रोहित शर्मा याने शुभमन गिल याच्या प्रकृतीबाबत अपडेट दिली आहे. शुभमन गिल खेळण्यासाठी तयार असल्याचे रोहित शर्मा याने सांगितले. डेंग्यू झाल्यामुळे शुभमन गिल विश्वचषकाच्या पहिल्या दोन सामन्याला मुकला होता. पण आता त्याने डेंग्यूवर मात केली आहे. तो लवकरच मैदानावर परतणार आहे. पाकिस्ताननिरोधात गिल मैदानात उतरल्यास भारताच्या फलंलादाजीची ताकद आणखी वाढणार आहे.
ऑस्ट्रेलियाविरोधातील (IND vs AUS) सामन्याआधी शुभमन गिल डेंग्यूने बेजार झाला होता. त्यामुळे त्याला दोन सामन्याला मुकावे लागले. पण शुभमन गिल याने डेंग्यूचा पराभव करत मैदानावर कमबॅक करत आहे. गुरुवारी शुभमन गिल याने नेट्समध्ये कसून सराव केला. आता गिलच्या कमबॅकमुळे भारतीय संघाची ताकद वाढली आहे. मागील वर्षभराची आकडेवारी पाहिल्यास शुभमन हा टीम इंडियाचा सर्वोत्तम खेळाडू आहे. त्याने अनेक सामन्यात चांगली कामगिरी केली आहे. गिलने आतापर्यंत खेळलेल्या 35 एकदिवसीय सामन्यांमध्ये 1917 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने 6 शतके आणि 9 अर्धशतके केली आहेत. गिलचा एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम स्कोअर 208 धावा आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत शुभमनने चमकदार कामगिरी केली होती. इंदूर वनडेत त्याने शतक झळकावले. याआधी त्याने मोहालीत 74 धावांची इनिंग खेळली होती. पाकिस्तानविरोधात मैदानात परतल्यास भारतासाठी तो मोठा प्लस पॉइंट असेल.
Rohit Sharma said "99% Shubman Gill is available for selection tomorrow".
— Johns. (@CricCrazyJohns) October 13, 2023
- Great news for India...!!!! pic.twitter.com/HLkzPMD5dm
मागील वर्षभरात गिल तुफान फॉर्मात
शभुमन गिलने सप्टेंबर महिन्यात दोन शतक ठोकली होती. आशिया चषकात बांगलादेशविरोधात शुभमन गिल याने शतकी खेळी केली होती. त्याशिवाय मायदेशात ऑस्ट्रेलियाविरोधात शतक झळकावले होते. गिल याने यादरम्यान तीन अर्धशतकेही झळकावली आहे. आठ डावात शुभमन गिल फक्त दोन वेळा 50 पेक्षा कमी धावसंख्येवर बाद झाला आहे.
वनडेमध्ये शुभमनच्या फलंदाजाची सरासरी 65+
शुभमन गिल भारताचा टॉप क्लास फलंदाज आहे. 24 वर्षीय शुभमन गिल याने वर्षभरात खोऱ्याने धावा चोपल्या आहेत. शुभमन गिल याने अवघ्या 35 डावांता 66.1 च्या सरासरीने 1917 धावांचा पाऊस पाडला आहे. त्याचा स्ट्राईक रेटही 102.84 इतका आहे. आयसीसीच्या वनडे क्रमवारीत शुभमन गिल दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. शुभमन गिल डेंग्यूमुळे विश्वचषकाच्या पिहिल्या दोन्ही सामन्याला मुकला आहे. ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानविरोधात गिल मैदानात दिसला नव्हता. आता डेंग्यूचा सामना केल्यानंतर तो लवकरच मैदानात परतणार आहे. गिल पाकिस्तानविरोधात खेळणार का? याकडे चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.