(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ind vs Pak Tickets : भारत-पाकिस्तान सामन्याच्या तिकिटांची ब्लॅकने विक्री? 57 लाखाचे तिकीट होतंय व्हायरल
IND vs PAK World Cup 2023: अहमदाबाद येथे 14 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्याच्या तिकिटांची ब्लॅकने विक्री होत असल्याची तक्रार होत आहे.
IND vs PAK World Cup 2023 Match Tickets : 5 ऑक्टोबरपासून सुरु होणारा क्रिकेटचा वर्ल्ड कप म्हणजे सर्वात मोठ्या उत्सवापैकी एक. त्यातही भारत विरुद्ध पाकिस्तान सामना म्हणजे क्रिकेट फॅन्ससाठी पर्वणीच. या विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान सामन्याचा थरार 14 ऑक्टोबरला रंगणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणाऱ्या या सामन्याची तिकिटांची विक्री आणि तिकिटांची किंमत सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलीय.
काही संकेतस्थळावर या सामन्याच्या एका तिकिटाची किंमत (IND vs PAK World Cup 2023 Match Tickets) तब्बल 57 लाख दाखवत असल्याचा दावा क्रिकेटप्रेमींनी केला आहे. त्यापाठोपाठ इतरांनीही आपल्या तिकीट खरेदीचा अनुभव आणि ऑनलाईन तिकिटाचे स्क्रिनशॉट्स शेअर केलेत. त्यात काही तिकिटांची किंमत 1 लाखांपेक्षा जास्त तर काही तिकिटांची किंमत दोन लाखांपेक्षा जास्त दिसत आहे. ऑफिशियल साईटवरील तिकिटं काही मिनिटात संपली. मात्र आता या काही साईट्सवर अव्वाच्या सव्वा किंमतीत ही तिकिटं उपलब्ध असल्याचं दिसतंय.
थोडक्यात हा ब्लॅकने तिकीट विक्रीचा प्रकार सुरु असल्याचा आरोप क्रिकेटप्रेमी करत आहेत. यावरुन अनेकांनी बीसीसीआय आणि बीसीसीआयचे अध्यक्ष जय शाह यांना टॅग करत तक्रारही केली आहे. महत्त्वाचं म्हणजे माजी कसोटीवीर वेंकटेश प्रसाद यानेही या प्रकारावर भाष्य केलं आहे. 1 लाख क्षमतेच्या स्टेडियममध्ये फक्त साडे आठ हजार तिकिटं विक्रीसाठी ठेवणं हा अन्याय असल्याचं सांगत बीसीसीआय यात आणखी पारदर्शकता आणेल अशी आशा वेंकटेश प्रसादने व्यक्त केलीय.
So @BCCI and @bookmyshow this is how you were encouraging black marketing of world cup tickets?Utter nonsense with no accountability to the fans at all. Taking us for granted. @JayShah @venkateshprasad #WorldCup2023 #BookMyShowScam #BookMyShow pic.twitter.com/tgdmlcMPrC
— Prathamesh Joshi (@ImCAPJoshii) September 5, 2023
क्रिकेटच्या या महा उत्सवात आपणही कधीतरी थेट स्टेडियमवर उपस्थित राहून सामना बघावा, खेळाचा प्रत्यक्षात आनंद लुटावा असं प्रत्येक क्रिडाप्रेमींचं स्वप्न असतं. मात्र अशा पद्धतीने एका तिकिटासाठी लाखावर पैसे मोजणं त्याच्या स्वप्नांच्याही पलिकडची गोष्ट असते. जर सामान्य क्रिकेटप्रेमीच्या स्वप्नांचा असा काळाबाजार होत असेल तर यापेक्षा दुर्देव ते काय?
Black market is now hot…see the prices for Ind vs Pak match it starts from 1.5lac and i have seen ticket of 15lac as well with Long On view …this is ridiculous @BCCI @ICC should do something about this@bookmyshow #BookMyShowScam #BCCI pic.twitter.com/C4VQXoyTlR
— Sahil Deshmukh (@sahil_deshmukh_) September 3, 2023
ही बातमी वाचा: