Ind vs Pak : हस्तांदोलन वादात मोठा खुलासा! टॉसच्या 4 मिनिटे आधी मॅच रेफरीला BCCI कडून मिळाला 'तो' मेसेज, जाणून घ्या नेमकं काय घडलं?
Handshake Controversy Asia Cup 2025 : भारत–पाकिस्तान सामन्यादरम्यान मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्ट यांच्या वागणुकीवरून उभा राहिलेला वाद आता जवळपास संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.

Ind vs Pak Handshake Controversy Asia Cup 2025 : भारत–पाकिस्तान सामन्यादरम्यान मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्ट यांच्या वागणुकीवरून उभा राहिलेला वाद आता जवळपास संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) आयसीसीकडे पत्रं लिहून पायक्रॉफ्ट यांना आशिया कपमधील सामन्यांतून हटवण्याची मागणी केली होती. मात्र आयसीसीने स्पष्ट केले की पायक्रॉफ्ट यांनी कोणत्याही नियमांचे उल्लंघन केलेले नाही.
टॉसपूर्वी नेमकं काय घडलं?
दरम्यान, दुबईत झालेल्या ग्रुप ए सामन्याच्या टॉसपूर्वी घडलेल्या प्रकारावर नवा खुलासा झाला आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या अहवालानुसार, टॉस होण्याच्या अवघ्या चार मिनिटे आधीच पायक्रॉफ्ट यांना ‘नो हँडशेक’ प्रोटोकॉलबद्दल माहिती देण्यात आली होती. आशियाई क्रिकेट परिषदचे (ACC) वेन्यू मॅनेजर यांनी त्यांना कळवले की भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव आणि पाकिस्तानी कर्णधार सलमान अली आगा टॉसनंतर हस्तांदोलन करणार नाहीत. हा संदेश बीसीसीआयमार्फत आला होता आणि भारतीय सरकारकडून मान्यता मिळालेली होती.
CAKEWALK 👏#TeamIndia cruise past Pakistan, chasing 127 inside 16 overs 🤩
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) September 14, 2025
Watch #DPWorldAsiaCup2025, from Sept 9-28 on the Sony Sports Network TV channels & Sony LIV.#SonySportsNetwork #INDvPAK pic.twitter.com/EncO07RSlD
पायक्रॉफ्टचा निर्णय
ही माहिती मिळताच पायक्रॉफ्ट यांनी तातडीने पाकिस्तानी कर्णधार सलमानला कळवले, जेणेकरून त्याला मैदानावर अवघड किंवा लज्जास्पद परिस्थितीचा सामना करावा लागू नये. आयसीसीला त्वरित कळवण्याइतका वेळ नसल्यामुळे त्यांनी थेट कर्णधाराला सांगणे योग्य ठरवले. प्रत्यक्षात त्यांनी पाकिस्तानलाच वादातून वाचवण्याचा प्रयत्न केला होता.
पीसीबीची तक्रार अन्...
भारताकडून पराभवानंतर पीसीबीने आयसीसीकडे तक्रार दाखल केली की, पायक्रॉफ्ट यांनी ‘कोड ऑफ कंडक्ट’चे उल्लंघन केले आहे आणि त्यांना तत्काळ सामनाधिकारी पदावरून काढावे. इतकेच नव्हे तर, पायक्रॉफ्ट न हटविल्यास यूएईविरुद्धचा सामना न खेळण्याची धमकीही दिली. मात्र आयसीसीने ठाम भूमिका घेत पीसीबीची मागणी फेटाळली. त्यानंतर पाकिस्तानने पुन्हा नाट्य करत यूएईविरुद्धचा सामना तब्बल तासभर उशिरा सुरू केला.
पायक्रॉफ्टची प्रतिक्रिया
पीसीबीने दावा केला की पायक्रॉफ्ट यांनी त्यांच्याकडे माफी मागितली. पण नंतर स्पष्ट झाले की, त्यांनी केवळ “गैरसमज झाल्याबद्दल खेद” व्यक्त केला होता; नियमभंग मान्य केलेला नव्हता. आयसीसीनेही पीसीबीला कळवले की पायक्रॉफ्ट यांच्या कडून प्रोटोकॉल मोडले गेलेले नाहीत. वेळ मिळाला असता तर ते निश्चितच आयसीसीला आधी कळवले असते.
हे ही वाचा -





















