एक्स्प्लोर

Dunith Wellalage Father Death: मुलाच्या गोलंदाजीवर मोहम्मद नबीने 5 षटकार ठोकले; वडिलांना सहन झाले नाही, श्रीलंकेच्या गोलंदाजाच्या वडिलांचा हार्ट अटॅकने मृत्यू

SL vs AFG Asia Cup 2025 Dunith Wellalage Father Death: अफगाणिस्तानच्या अनुभवी फलंदाज मोहम्मद नबीने श्रीलंकेविरुद्ध तुफानी अर्धशतकी खेळी खेळत धुमाकूळ घातला. नबीने केवळ 22 चेंडूत 3 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 60 धावा ठोकल्या.

SL vs AFG Asia Cup 2025 Dunith Wellalage Father Death: आशिया चषकाच्या स्पर्धेत काल (18 सप्टेंबर) अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्यात शेवटचा साखळी सामना खेळवण्यात आला. या सामन्यात श्रीलंकेने 6 विकेट्सने विजय मिळत सुपर-4 मध्येही प्रवेश केला. मात्र याचदरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

श्रीलंकेचा गोलंदाज दुनिथ वेल्लालगेच्या (Dunith Wellalage) वडिलांचे हार्ट अटॅकनं निधन झालं आहे. एका षटकात 5 षटकार ठोकले गेल्यानं दुनिथ वेल्लालगेच्या वडिलांना हार्ट अटॅक आल्याचं बोललं जात आहे. वेल्लालगेचे वडील श्रीलंकेतल्या कँडीत टीव्हीवर सामना पाहत होते. अफगाणिस्तानकडून मोहम्मद नबी फलंदाजी करत असताना डावातील शेवटचे षटक दुनिथ वेल्लालगे टाकले. दुनिथ वेल्लालगेच्या या शेवटच्या षटकात मोहम्मद नबीने 32 धावा लुटल्या. यामध्ये तब्बाल 5 षटकार मोहम्मद नबीने टोलावले.  आपल्या मुलाच्या एकाच षटकात पाच षटकार ठोकले गेल्याचं वेल्लालगेच्या वडिलांना ते सहन झालं नाही. त्यानंतर दुनिथ वेल्लालगेच्या वडिलांना हार्ट अटॅक आल्याचं बोललं जात आहे. 

नेमकं काय घडलं?

खरंतर अफगाणिस्ताननं प्रथम फलंदाजी केली होती आणि 20 षटकांत 8 बाद 169 धावा केल्या होत्या. सामन्यात अजून चुरसही निर्माण झाली नव्हती. पण आपल्या मुलाच्या एकाच षटकात पाच षटकार ठोकले गेल्याचं वेल्लालगेच्या वडिलांना ते सहन झालं नाही आणि दुनिथ वेल्लालगेच्या वडिलांचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. विशेष म्हणजे हा सामना श्रीलंकेनं 8 चेंडू आणि 6 गडी राखून जिंकला आणि सुपर फोरमध्ये प्रवेशही केला. पण हा विजय पाहायला दुनिथ वेल्लालगेचे वडील जिवंत नव्हते. मोहम्मद नबीला ही वार्ता कळताच तोही काही काळ स्तब्ध होऊन गेला.

मोहम्मद नबीने घातला धुमाकूळ-

अफगाणिस्तानच्या अनुभवी फलंदाज मोहम्मद नबीने श्रीलंकेविरुद्ध तुफानी अर्धशतकी खेळी खेळत धुमाकूळ घातला. नबीने केवळ 22 चेंडूत 3 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 60 धावा ठोकल्या. यावेळी त्याने दुनिथ वेल्लालागेच्या एका षटकात सलग 5 षटकार ठोकण्याचा विक्रम केला.

श्रीलंकेचा अफगाणिस्तानवर विजय

170 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेने 18.4 षटकांत 4 गडी गमावून विजय मिळवला. यष्टीरक्षक-फलंदाज कुसल मेंडिसने श्रीलंकेकडून शानदार अर्धशतक झळकावले आणि विजय मिळवला. त्याने 52 चेंडूत 10 चौकारांसह नाबाद 74 धावा केल्या. कुसल परेराने 20 चेंडूत 3 चौकारांसह 28 धावा केल्या. कामिंदू मेंडिसने 13 चेंडूत 2 षटकारांसह नाबाद 26 धावा केल्या. अफगाणिस्तानकडून मुजीब उर रहमान, अझमतुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी आणि नूर अहमद यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. त्याआधी, मोहम्मद नबीच्या शानदार खेळीमुळे अफगाणिस्तान 169 धावा करू शकला.

सुपर-4 चं समीकरण ठरलं-

भारत आणि पाकिस्तानने आशिया कप 2025 च्या सुपर फोरमध्ये ग्रुप अ मधून आधीच पात्रता मिळवली होती. त्यानंतर ग्रुप ब मधून श्रीलंका आणि बांगलादेशचा संघ सुपर-4 मध्ये दाखल झाला. 

सुपर-4 आणि अंतिम सामना

20 सप्टेंबर – श्रीलंका विरुद्ध बांगलादेश
21 सप्टेंबर – भारत विरुद्ध पाकिस्तान
23 सप्टेंबर – पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका
24 सप्टेंबर – भारत विरुद्ध बांगलादेश
25 सप्टेंबर – पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश
26 सप्टेंबर – भारत विरुद्ध श्रीलंका
28 सप्टेंबर – अंतिम सामना 

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या बातम्या, VIDEO:

हेही वाचा - 

AFG vs SL Asia Cup 2025 : 6, 6, 6, 6, 6... मोहम्मद नबीचं वादळ, लंकेला बसला तडाखा! सलग 5 षटकार अन् शेवटच्या 2 षटकांत ठोकल्या 49 धावा, पाहा Video

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli and Rohit Sharma : विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
 विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
IND vs ENG 2nd ODI: कुलदीप यादव IN, गुरनूर ब्रार OUT...; इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेसाठी अशी असेल टीम इंडियाची Playing XI
कुलदीप यादव IN, गुरनूर ब्रार OUT...; इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेसाठी अशी असेल टीम इंडियाची Playing XI
ICC :  वनडे वर्ल्ड कप 2027 मध्ये भारत- पाकिस्तान तीन वेळा आमने सामने? आयसीसीनं फॉरमॅट बदताच क्रिकेटप्रेमींनी संभाव्य समीकरण शोधून काढलं
वनडे वर्ल्ड कप 2027 मध्ये भारत- पाकिस्तान तीन वेळा आमने सामने? आयसीसीनं फॉरमॅट बदलताच क्रिकेटप्रेमींनी अंदाज बांधला
ICC : वनडे वर्ल्ड कप आणि टी 20 वर्ल्ड कपचा फॉरमॅट बदलला, आयसीसीचा मोठा निर्णय, सुपर-7,  सुपर -10 सह एलिमिनेटरचा समावेश
वनडे वर्ल्ड कप आणि टी 20 वर्ल्ड कपचा फॉरमॅट बदलला, आयसीसीचा मोठा निर्णय, सुपर-7,  सुपर -10 सह एलिमिनेटरचा समावेश

व्हिडीओ

Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Re-NEET UG 2026 Result: नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
UDAN : ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
Virat Kohli and Rohit Sharma : विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
 विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
Embed widget