एक्स्प्लोर

IND vs NZ  : भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा, किवींना अवघ्या 62 धावांत गुंडाळले

India vs New Zealand 2nd Test : एजाज पटेलनं संपूर्ण भारतीय संघाला बाद करत विश्वविक्रम रचला. मात्र, न्यूझीलंडला हा आनंद फार काळ साजरा करता आला नाही.

India vs New Zealand 2nd Test : भारत आणि न्यूझीलंड यांच्यादरम्यान मालिकेतील अखेरचा कसोटी सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर सुरु आहे. एजाज पटेलच्या विश्वविक्रमाच्या बळावर न्यूझीलंड संघानं भारताला 325 धावांवर रोखलं. एजाज पटेलनं संपूर्ण भारतीय संघाला बाद करत विश्वविक्रम रचला. मात्र, न्यूझीलंडला हा आनंद फार काळ साजरा करता आला नाही. कारण, भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा करत न्यूझीलंड संघाला अवघ्या 62 धावांत गुंडाळलं. कर्णधार केन विल्यमसनच्या अनुपस्थितीत खेळणारा न्यूझीलंडचा संघ अतिशय दुबळा दिसत होता. 263 धावांची आघाडी असतानाही भारतीय संघानं फॉलोअन देण्याचा निर्णय घेतला नाही. भारतीय संघ दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी मैदानावर उतरला आहे.

325 धावांचा बचाव करताना भारतीय गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर मारा केला. सिराजने आघाडीच्या तीन फलंदाजांना बाद करत न्यूझीलंडचं कंबरडं मोडलं. तर अश्विनने चार फलंदाजांना बाद करत न्यूझीलंडची अवस्था अधिकच बिकट केली. अक्षर पटेलने दोन तर जयंत यादव यांने एक बळी घेतला. न्यूझीलंडकडून एकाही फलंदाजाला आपल्या लौकिकास साजेशी फंलदाजी करता आली नाही. कर्णधार टॉम लेथम, रॉस टेलर, डॅरेल मिचेल, विल यंग आणि हेन्री निकोलस यासारख्या फलंदाजांना आपल्या लौकिकास खेळी करण्यात अपयश आलं. न्यूझीलंडकडून फक्त दोन फलंदाजांना दहा धावांचा टप्पा ओलांडता आला. जेमिसनने सर्वाधिक 17 धावा केल्या तर लेथमला दहा धावा करता आल्या. यांच्याशिवाय एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा ओलांडता आला नाही.

एजाज पटेलच्या फिरकी माऱ्यापुढे भारतीय संघ ढेपाळत होता. अशात सलामीवीर फलंदाज मयांक अग्रवाल आणि अष्टपैलू अक्षर पटेल यांनी भारतीय संघाचा डाव सावरला. मयांकने 150 धावांची खेळी केली तर अक्षर पटेल याने अर्धशतकी खेळी केली. एजाज पटेलने दर्जेदार आणि अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत संपूर्ण भारतीय संघाला बाद केलं.  

संबधित बातम्या :
Ajaz Patel: वानखेडेवर पटेली! मुंबईकर एजाज पटेलनं इतिहास रचला, एका डावात 10 विकेट्स; अनिल कुंबळेंच्या विक्रमाशी केली बरोबरी
IND vs NZ 2nd Test : मूळ मुंबईकर गोलंदाजानं वानखेडेवर टीम इंडियाची उडवली दाणादाण! दिग्गजांना गुंडाळलं...
Ajaz Patel's 10 wicket Haul: आठव्या वर्षी मुंबई सोडली, 33 व्या वर्षी मुंबईत येऊन इतिहास रचला; 10 विकेट घेणाऱ्या एजाज पटेलची कारकीर्द

Anil Kumble on Ajaz Patel : 'वेल कम टू क्लब!' एजाजच्या विक्रमानंतर अनिल कुंबळेंचं ट्वीट
Ajaz Patel : काल स्वप्न पाहिलं आज पूर्ण केलं; एजाजचा वानखेडेवरील 'तो' फोटो व्हायरल!

मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live

नामदेव कुंभार हे मागील नऊ ते दहा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. क्रीडा, राजकारण, समाजकारण, शेती, चित्रपट, टेक-ऑटो  अशा विविध विषयांमध्ये आवड आहे. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Afg T20 Series Schedule: श्रीलंकेनंतर भारत आणि अफगाणिस्तानमध्ये रंगणार टी-20 मालिका; संपूर्ण वेळापत्रक जाहीर, कुठे, कधी, किती वाजता होणार समाने?
श्रीलंकेनंतर भारत आणि अफगाणिस्तानमध्ये रंगणार टी-20 मालिका; संपूर्ण वेळापत्रक जाहीर, कुठे, कधी, किती वाजता होणार समाने?
Abishek Porel Arrested : मोठी बातमी: IPL मधील स्टार अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचं आमिष दाखवून मेडिकलच्या विद्यार्थिनीसोबत नको नको ते केलं; नेमकं काय घडलं?
IPL मधील स्टार अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचं आमिष दाखवून मेडिकलच्या विद्यार्थिनीसोबत नको नको ते केलं; नेमकं काय घडलं?
Team India Squad For ODI World Cup 2027 : रोहित, शुभमनसह 4 अष्टपैलू खेळाडूंना स्थान; सुनील गावसकरांनी 2027 च्या वर्ल्ड कपसाठी निवडला 15 खेळाडूंचा चक्रावून टाकणारा संघ, अनेक दिग्गजांना डच्चू
रोहित, शुभमनसह 4 अष्टपैलू खेळाडूंना स्थान; सुनील गावसकरांनी 2027 च्या वर्ल्ड कपसाठी निवडला 15 खेळाडूंचा चक्रावून टाकणारा संघ, अनेक दिग्गजांना डच्चू
IND vs SL 1st Test Playing XI : सरफराज खान IN, ध्रुव जुरेल OUT... श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीत अशी असणार टीम इंडियाची प्लेइंग-11
सरफराज खान IN, ध्रुव जुरेल OUT... श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीत अशी असणार टीम इंडियाची प्लेइंग-11

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget