कानपूर : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याचा चौथा दिवशीचा खेळ नुकताच संपला आहे. आज काही भारतीय खेळाडूने दर्जेदार खेळाचं दर्शन घडवलं. ज्यामुळे भारताने आधी 234 धावांवर डाव घोषित करत न्यूझीलंडला 284 धावांचं आव्हान दिलं. ज्यानंतर अखेरच्या काही षटकात एक विकेटही टीपला असल्याने आता न्यूझीलंडला 9 गड्यांच्या मदतीने 280 धावा करण्याची गरज आहे.



चौथ्या दिवशी एकीकडे सुरुवातीपासून भारताचे एकापाठी एक खेळाडू तंबूत परतत असताना या कसोटीचा स्टार खेळाडू श्रेयस अय्यरने अनुभवी आर आश्विनसोबत डाव सांभाळला. आश्विनने महत्त्वपूर्ण 32 धावा केल्यानंतर तो बाद झाला. नंतर अय्यरने मात्र आपलं अर्धशतक पूर्ण केलं. पण तोही 65 धावा करुन तंबूत परतला. ज्यानंतर शेवटच्या फळीतील रिद्धिमान साहा (नाबाद 61) आणि अक्षर पटेल (नाबाद 28) यांनी महत्त्वपूर्ण खेळी केली. ज्यानंतर अखेर भारताने 234 धावा झाल्यानंतर डाव घोषित करत किवींना विजयासाठी 284 धावांचे आव्हान ठेवले. ज्यानंतर गोलंदाजी करताना आश्विनने तिसऱ्याच षटकात सलामीवीर विल यंगला पायचीत करत दिवस अखेर न्यूझीलंडची अवस्था 4 वर एक बाद अशी केली आहे. आता पाचव्या दिवशी किवींना विजयासाठी 9 गड्यांच्या मदतीने 280 धावा करण्याची गरज आहे. 


अय्यर पुन्हा चमकला, साहानेही सावरलं


दिवसाच्या सुरुवातीपासून भारताचे फलंदाज एक एक करुन तंबूत परतत होते. पण त्याचवेळी पहिल्या डावात सलामीच्या सामन्यात शतक झळकावणाऱ्या श्रेयसने संघाची जबाबदारी घेत एक उत्तम खेळी खेळला. त्याला आश्विननेही 32 धावांची चांगली साथ दिली. अय्यरने आज 125 चेंडूत 65 धावा केल्या. एकाच सामन्यात दोन शतकं ठोकण्यापासून तो 35 धावांनी हुकला. तर दुसरीकडे मानेच्या दुखापतीमुळे क्षेत्ररक्षणापासून लांब राहिलेल्या रिद्धिमान साहानेही 126 चेंडूत 61 धावा करत संघासाठी महत्त्वाचं योगदान दिलं.  


संबधित बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha