कानपूर : भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात सुरु असलेल्या कसोटी सामन्यात भारताच्या युवा खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली आहे. सध्या सामन्यात भारत पिछाडीवर पडला असला, तरी काही खेळाडूंच्या चमकदार कामगिरीमुळे भारताला कसोटीतील नवे हिरे दिले आहेत. यात सर्वत्र पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकावणाऱ्या श्रेयस अय्यरची चर्चा असली तरी बदली खेळाडू म्हणून मैदानात आलेल्या एका युवा खेळाडूने उल्लेखनीय कामगिरी केली आहे.


हा खेळाडू म्हणजे केएस भरत (KS Bharat). भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात तिसऱ्या दिवशी भरतला रिद्धिमान साहाच्या (Wriddhiman Shah) जागी यष्टीरक्षण करण्याची  संधी मिळाली आणि याचवेळी त्याने आपल्या अप्रतिम प्रदर्शनाने सर्वांचीच मनं जिंकली. भरतने तिसऱ्या दिवशी 85.3 ओव्हर भारताकडून यष्टीरक्षण करताना काही अप्रतिम झेल टिपले, तर स्टम्पिगमध्येही जलवा दाखवला. त्यामुळे आता भारताला एक नवा यष्टीरक्षक हिरा मिळाला असून दुसऱ्या कसोटीतही त्याला जागा मिळण्याची दाट शक्यता आहे. 


साहाच्या अडचणीत वाढ


भारताचा कसोटी क्रिकेटमधील महत्त्वाचा यष्टीरक्षक रिद्धिमान साहा तिसऱ्या कसोटीत क्षेत्ररक्षणावेळी मान अकडल्याने मैदानावर येऊ शकला नाही. ज्यामुळे भरता संधी मिळाली. त्यात या 28 वर्षीय युवा भरतने आता उत्तम कामगिरी केल्याने त्याची जागा संघात फिक्स होऊ शकते. कारण भरतने यंदा आयपीएलमध्ये आरसीबीकडून चांगली फलंदाजी केली होती. ज्यामुळे त्याला जागा नक्कीच मिळू शकते. 


हे ही वाचा



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha