कानपूर : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याचा तिसऱ्या दिवशीचा खेळ संपला आहे. तिसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडला 296 धावांवर सर्वबाद करत फलंदाजीला सुरुवात केली. भारताचा सलामीवीर शुभमन (Shubhman Gill) एक धाव करुन बाद झाला असून दिवसखेऱ भारताने 63 धावांची आघाडी घेत भारताची स्थिती 14 धावांवर एक बाद अशी आहे. आजच्या दिवशी न्यूझीलंडच्या निम्म्या संघाला तंबूत धाडत 5 विकेट घेणारा अक्षर पटेल (Akshar Patel) हिरो ठरला आहे.



सामन्याची सुरुवात भारताने नाणेफेक जिंकत फलंदाजीने केली. ज्यानंतर श्रेयसच्या शतकासह (105), शुभमन (52), जाडेजा (50) यांच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने 345 धावा केल्या. ज्यानंतर न्यूझीलंडकडून 151 धावापर्यंत एकही गडी बाद झाला नाही. ज्यानंतर आश्विनने पहिली विकेट घेत भारताला पहिलं यश मिळवून दिलं. ज्यानंतर अक्षरच्या फिरकीसह आश्विनने कमाल कायम ठेवत 296 धावांवर न्यूझीलंडला रोखलं. अक्षरने 5, आश्विनने 3 आणि जाडेजा-यादवने प्रत्येकी एक विकेट घेतला. न्यूझीलंडकडून लाथमने 95 आणि यंगने 89 या सर्वाधिक धावा केल्या. ज्यानंतर फलंदाजीला भारताने सुरुवात करताच पहिल्या डावात अर्धशतक झळकावणारा शुभमन गिल एक धाव करुन बाद झाला आहे. दिवस अखेर भारताची स्थिती 14 वर एक बाद अशी आहे.


अक्षर पटेलची कमाल


न्यूझीलंडसारख्या एका तगड्या कसोटी संघाला दोन सेशनमध्ये बाद करण्याची कमाल भारताने फिरकीपटू अक्षर पटेलच्या मदतीने केली. त्याने उत्कृष्ट गोलंदाजी करत 34 षटकांपैकी 6 षटकं निर्धाव टाकली. यावेळी 62 धावा देत न्यूझीलंडचे 5 फलंदाज बाद केले. त्याने लॅथम, टेलर, ब्लंडल, हेन्री निकोल्स आणि साऊदी हे महत्त्वाचे विकेट मिळवले.   


हे ही वाचा



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha