Cheteshwar Pujara On Ajinkya Rahane: भारत आणि न्यूझीलंड (IND Vs NZ) यांच्यातील पहिला कसोटी सामना 25 नोव्हेंबरपासून कानपूर येथे खेळला जाणार आहे. या कसोटी सामन्यापूर्वी उपकर्णधार चेतेश्वर पुजारानं पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी पुजारानं आपण लवकरच शतक झळकावणार असल्याचं म्हटलंय. त्यावेळी त्यानं भारताचा फलंदाज अजिंक्य रहाणेचंही समर्थन केलंय. राहाणे एक उत्कृष्ट खेळाडू आहे. रहाणे त्याचा फॉर्म परत मिळवण्यापासून केवळ एक डाव दूर असल्याचं पुजारानं म्हंटलंय. 


पुजारानं घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्याला शतकाबाबत विचारण्यात आले. त्यावेळी पुजारा म्हणाला की, "मी 50-60 धावा करत आहे. जोपर्यंत मी असा खेळत आहे, तोपर्यंत काळजी करण्यासारखं काही नाही. मी लवकरच शतक झळकवणार आहे, असा इशाराही त्यानं न्यूझीलंडच्या संघाला दिलाय. त्यानं अजिंक्य रहाणेबाबतही हेच सांगितलं. रहाणे हा मोठा खेळाडू आहे. काही वेळा खेळाडूला वाईट फॉर्मचा सामना करावा लागतो. रहाणे त्याच्या फॉर्मपासून फक्त एक डाव दूर आहे. तो सध्या चांगल्या स्थितीत आहे. न्यूझीलंडविरुद्ध मालिकेत तो चांगली कामगिरी करण्याची शक्यता आहे, असा विश्वास पुजारानं व्यक्त केलाय. 


अजिंक्य रहाणेनं 2019 पासून भारतासाठी 40 कसोटी सामने खेळले आहेत. यात सात अर्धशतक आणि तीन शतकांचा समावेश आहे. न्यूझीलंडविरुद्ध खेळण्यात येणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणे भारतीय कसोटी संघाचं नेतृत्व करणार आहे. तर, विराट कोहली दुसऱ्या कसोटी सामन्यात पुनरागमन करणार आहे. माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडच्या प्रशिक्षणाखाली भारतीय संघ पहिली कसोटी मालिका खेळणार आहे. 


भारताचा कसोटी संघ:
अजिंक्य रहाणे (कर्णधार), मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), शुबमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, वृद्धिमान साहा (विकेटकिपर), केएस भरत (विकेटकिपर), रवींद्र जडेजा, आर अश्विन, अक्षर पटेल, जयंत यादव, इशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha


हे देखील वाचा-