कोलकाता : भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट ऑलराऊंडर म्हणजे कपिल देव (Kapil Dev). कपिल यांच्यासारखा अष्टपैलू भारताला आजवर मिळालेला नाही, अनेक नव्या दमाच्या खेळाडूंची कपिल यांच्याशी तुलना केली जाते. पण कोणालाच त्यांच्यासारखा खेळ करता येत नाही. दरम्यान कपिल यांनी स्वत: भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडूंबाबत वक्तव्य केलं आहे. त्यांनी आपला आवडता अष्टैपूल खेळाडू कोण? या प्रश्नाचं उत्तर देत दोन खेळाडूंचं नाव घेतलं आहे.


कपिल यांनी हार्दीक हा गोलंदाजी करत नसल्याने त्याला ऑलराऊंडर कसं म्हणायचं असं वक्तव्य केलं असून तेव्हाच आवडता ऑलराऊंडर म्हणजे रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) आणि आर आश्विन (R Ashwin) असंही कपिल यांनी म्हटलं आहे. दरम्यान आश्विनने मागील काही काळात अप्रतिम क्रिकेटचं दर्शन घडवल्याचं कपिल म्हणाले. तर जाडेजाने मागील काही काळात फलंदाजीवर अधिक लक्ष दिल्याने त्याचं गोलंदाजीवरचं लक्ष कमी झाल्याचंही कपिल यांनी नमूद केलं. 


हार्दिकला ऑलराऊंडर कसं म्हणायचं?


कपिल यांनी हार्दिकबद्दल बोलताना थेट त्याच्या संघातील भूमिकेवरच थेट प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, ''ऑलराऊंडर खेळाडूचं काम गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही करणं असतं. पण हार्दीक सध्या गोलंदाजी करत नसल्याने त्याला ऑलराऊंडर कसं म्हणायचं? सध्या त्याला योग्य सराव करुन स्वत:ला वेळ देण्याची गरज आहे. त्यानेच तो पुन्हा गोलंदाजी करुन फॉर्ममध्ये परत येऊ शकतो.'' कपिल हे कोलकाता येथील रॉयल कोलकाता गोल्फ कोर्स येथे बोलत होते. 


संबधित बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha