कानपूर : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात कानपूरच्या मैदानावर पहिला कसोटी सामना सुरु आहे. सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने एक चांगली धावसंख्या उभारली आहे. भारतीय संघाकडून 345 धावांचा डोंगर उभारण्यात आला असून यामध्ये पदार्पण करणाऱ्या श्रेयसचं (Shreyas Iyer) शतक एक सर्वात विशेष आणि मोठी गोष्ट आहे. पण याच शतकामुळे संघातील एका खेळाडूचं टेन्शन मात्र वाढलं आहे. हा खेळाडू म्हणजे कर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane). यामागील कारण म्हणजे मागील काही सामन्यांत खास कामगिरी करु न शकलेल्या रहाणेसाठी ही कसोटी म्हणजे जवळपास करो या मरो अशीच होती. ज्यात तो केवळ 35 धावा करु शकला, तर दुसरीकडे संघात त्याच्या स्थानावर अगदी परफेक्ट बसणाऱ्या श्रेयसने पदार्पणाच्या सामन्यातच शतक झळकावलं आहे. ज्यामुळे आता पुढील सामन्यामध्ये नेमकी प्लेयिंग 11 कशी असणार? हा मोठा प्रश्न संघ व्यवस्थापनासमोर उभा राहिला आहे.


भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरु असून पहिली कसोटी सध्या सुरु आहे. ज्यामध्ये विराटला विश्रांती दिल्यामुळे अजिंक्य रहाणे कर्णधारपद सांभाळत आहे. पण दुसऱ्या सामन्यात विराट पुन्हा कर्णधारपदावर येणार असल्याने संघ पूर्णपणे बदलणार आहे. विराटला संघात स्थान मिळताच कोणत्या फलंदाजाला विश्रांती द्यायची हा प्रश्न संघासमोर असणार आहे. दरम्यान विराट खेळणाऱ्या स्थानावर पुजारा, रहाणे आणि आता नव्याने संघात आलेल्या श्रेयस यांचा समावेश आहे. ज्यामध्ये अय्यरने शतक झळकावत आपलं स्थान पक्क केलं आहे. तर पुजारा 26 आणि रहाणे 35 धावा केल्यामुळे त्यांचं स्थान डळमळीत झालं आहे. त्यात रहाणे संघाचा उपकर्णधार असल्याने त्याची जबाबदारी मोठी आहे. ज्यामुळे दुसऱ्या कसोटीत त्याचच स्थान अधिक धोक्यात आहे. ट्वीटरवर देखील अनेक क्रिकेटप्रेमी रहाणेला बाहेर करुन अय्यरला संघात स्थान द्यावं अशी मागणी करत आहेत. त्यामुळे आता रहाणेला स्थान मिळणार का? आणि विराट कसा संघ निवडणार? या प्रश्नांमुळे दोन्ही कर्णधार चिंतेत पडले आहेत. 




भारताचा पहिला डाव


सामन्याची सुरुवात सलामीवीर शुभमनने उत्तम करुन दिली. अगरवाल (13) आणि पुजारा (26) यांनी त्याला काहीशी साथ दिली. तर पण शुभमनने अर्धशतक (52) झळकावल्यानंतर तोही तंबूत परतला. कर्णधार रहाणेही 35 धावा करुन बाद झाला, ज्यानंतर सलामीचा कसोटी सामना खेळणाऱ्या श्रेयस अय्यरने (Shreyas Ayer) अनुभवी रवींद्र जाडेजासह भारताचा डाव सावरत एक शतकी भागिदारी रचली. पहिल्या दिवसखेर अय्यर नाबाद 75 आणि जाडेजा नाबाद 50 धावांवर खेळत होते. ज्यानंतर दुसऱ्या दिवशीच्या सुरुवातीलाच जाडेजा बाद झाला. पण अय्यरने त्याचं शतक पूर्ण केलं. पण 13 चौकार आणि 2 षटकारांच्या मजदतीने 105 धावा करुन अय्यरही बाद झाला. दुसऱ्या दिवशी टीम साऊदीच्या भेद गोलंदाजीमुळे एक-एक भारतीय तंबूत परतत होते. पण त्याचवेळी अनुभवी रवींचंद्रन आश्विनने 38 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. ज्याला उमेश यादवने 34 चेंडूत 10 धावांची संयमी साथ देत भारताला 345 पर्यंत पोहचवलं. पण आश्विन बाद होताच इशांत शर्माही लगेचच तंबूत परतला आणि भारताला पहिला डाव 345 धावांवर आटोपला.


संबधित बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha