IND vs ENG, India Squad: इंग्लंडविरुद्ध अखेरच्या दोन कसोटी सामन्यासाठी BCCI कडून टीम इंडियाची घोषणा, 'या' खेळाडूंना संधी
इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने टीम इंडियाची घोषणा केली आहे.
India vs England: इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेच्या अखेरच्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) टीम इंडियाची घोषणा केली आहे. बीसीसीआयने अहमदाबादच्या मोटेरा येथे खेळल्या जाणार्या शेवटच्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघातील चार फिरकीपटूंना स्थान दिले आहे. उर्वरित दोन कसोटींमध्ये नियमित कर्णधार विराट कोहली टीम इंडियाचा कर्णधार असेल तर अजिंक्य रहाणे संघाचा उपकर्णधार राहिल. या चार सामन्यांच्या मालिकेच्या पहिल्या दोन कसोटी सामने चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळले गेले होते, त्यातील पहिली कसोटी इंग्लंडने जिंकली तर दुसरी कसोटीत भारताने विजय मिळवला आहे.
दुसर्या कसोटी सामन्यात पदार्पण करणारा फिरकीपटू अष्टपैलू अक्षर पटेल यालाही अखेरच्या दोन कसोटी सामन्यांमध्ये टीम इंडियामध्ये स्थान मिळाले. पटेलने पहिल्या सामन्याच्या पहिल्या डावात दोन गडी बाद केले तर दुसऱ्या डावात पाच बळी घेतले. त्याचबरोबर शानदार फॉर्ममध्ये धावणारा आर अश्विन फिरकी विभागाचे नेतृत्व करेल. यासह कुलदीप यादव आणि वॉशिंग्टन सुंदर यांनाही संघात स्थान देण्यात आले आहे.
#TeamIndia for last Two Tests against England announced.@Paytm #INDvENG
— BCCI (@BCCI) February 17, 2021
फलंदाजी विभागात कोणताही बदल नाही इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या दोन कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाच्या फलंदाजी विभागात कोणताही बदल झालेला नाही. रोहित शर्मा आणि शुभमन गिल तिसऱ्या आणि चौथ्या कसोटी सामन्यात डावाची सुरूवात करणार आहेत. दरम्यान, केएल राहुललाही बॅकअप म्हणून संघात स्थान मिळालं आहे. त्याचबरोबर, ऋद्धिमान साहा आणि ऋषभ पंत या दोघांना यष्टिरक्षक म्हणून स्थान देण्यात आले आहे. या व्यतिरिक्त अष्टपैलू हार्दिक पांड्याही शेवटच्या दोन कसोटी सामन्यांमध्ये टीम इंडियाचा भाग असणार आहे.
उमेश यादव संघात सहभागी होमार फिटनेस टेस्ट उत्तीर्ण झाल्यावर शार्दुल ठाकूरच्या जागी वेगवान गोलंदाज उमेश यादव अहमदाबादमध्ये टीम इंडियामध्ये सामील होईल. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत उमेश जखमी झाला होता. नुकतेच बीसीसीआयच्या विनंतीवरून उमेशला विजय हजारे ट्रॉफीमधून रिलीज करण्यात आले होते.
के एस भरत आणि राहुल चहर स्टँडबाय खेळाडू इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या दोन कसोटी सामन्यांसाठी विकेटकीपर फलंदाज के एस भरत आणि लेगस्पिनर राहुल चहर हे स्टँडबाय खेळाडू असतील. त्याचबरोबर आवेश खान, अंकित राजपूत, संदीप वॉरियर, के गौतम आणि सौरभ कुमार अंतिम दोन कसोटी सामन्यांसाठी नेट गोलंदाज असतील.