Ind vs Eng 5th Test Match: पाचव्या कसोटीसाठी इंग्लंडने जाहीर केला संघ; भारताची Playing XI कशी असेल?, दोन खेळाडू गौतम गंभीरच्या रडावर
India vs England 5th Test Match Team India Playing XI: भारताला पाचवा कसोटी सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागेल. यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे.

India vs England 5th Test Match Team India Playing XI: भारत आणि इंग्लंड (Ind vs Eng 5th Test Match) यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना 31 जुलैपासून खेळवला जाणार आहे. या कसोटी मालिकेत इंग्लंडचा संघ 2-1 ने आघाडीवर आहे. त्यामुळे पाचवा कसोटी सामना जिंकून मालिका बरोबरीत सोडवण्याचा प्रयत्न टीम इंडियाकडून असणार आहे.
भारताला पाचवा कसोटी सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागेल. यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे. मँचेस्टरमध्ये खेळल्या गेलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने तीन बदल केले होते. दुखापतीमुळे दोन बदल करण्यात आले होते, तर एक करुण नायरच्या खराब फॉर्ममुळे त्याला वगळून साई सुदर्शनला संधी देण्यात आली होती. तसेच आकाश दीपला दुखापत झाल्यानं अंशुल कंबोजला संधी देण्यात आली. तर जखमी नितीश कुमार रेड्डी यांच्या जागी शार्दुल ठाकूरला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले. परंतु चौथ्या कसोटी सामन्यात तिन्ही खेळाडू अपयशी ठरले.
दोन खेळाडू गौतम गंभीरच्या रडावर-
साई सुदर्शन आणि अंशुल कंबोजला पाचव्या कसोटीतून बाहेरचा रस्ता दाखवण्याची शक्यता आहे. सुदर्शनने या इंग्लंड दौऱ्यात कसोटी पदार्पण केले होते आणि दोन कसोटी सामन्यांमध्ये संधी मिळूनही तो त्याचा फायदा घेऊ शकला नाही. सुदर्शन दोन कसोटी सामन्यांमध्ये दोनदा शून्यावर बाद झाला आहे. यामुळेच संघ व्यवस्थापन करुण नायर किंवा अभिमन्यू ईश्वरन यापैकी एका खेळाडूला मैदानात उतरवू शकते. तर अंशुल कंबोजला चौथ्या कसोटी सामन्यात चांगली कामगिरी करता आली नाही. अंशुल कंबोजच्या गोलंदाजीत वेगही दिसला नाही. त्यामुळे अंशुल कंबोजच्या जागी अर्शदीप सिंगला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते. तसेच शार्दुल ठाकूरही फ्लॉप ठरला आहे. अशा परिस्थितीत टीम इंडिया कुलदीप यादवला अतिरिक्त फिरकी पर्यायासह संधी देऊ शकते.
टीम इंडियाची संभाव्य Playing XI :
शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, के. एल. राहुल, करुण नायर, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.
पाचव्या कसोटीसाठी इंग्लंडने जाहीर केला संघ-
बेन स्टोक्स (कर्णधार), जो रूट, ख्रिस वोक्स, जॅक क्रॉली, हॅरी ब्रूक, बेन डकेट, ब्रायडन कार्स, गस अॅटकिन्सन, जेमी ओव्हरटन, ऑली पोप, लियाम डॉसन, जेमी स्मिथ, जेकब बेथेल, जोफ्रा आर्चर, जोश टंग.
After a sole Test appearance three years ago, an all-rounder returns to the England squad ahead of the fifth #ENGvIND Test 👀
— ICC (@ICC) July 29, 2025
More from #WTC27 👉 https://t.co/pg6SKMh41f pic.twitter.com/ryARoPpv6R





















