एक्स्प्लोर

IND VS ENG 3rd T20 Vaibhav Sooryavanshi : मँचेस्टरमध्ये नुसती झलक दाखवली, आता नॉटिंगहॅममध्ये होणार खरा राडा; वैभव सूर्यवंशी पुन्हा कधी ॲक्शनमध्ये दिसणार? वाचा A टू Z

IND VS ENG 3rd T20 Vaibhav Sooryavanshi : इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला असला, तरी हा सामना एका ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार ठरला.

IND VS ENG 3rd T20 Vaibhav Sooryavanshi : इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला असला, तरी हा सामना एका ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार ठरला. अवघ्या 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला या सामन्यात पदार्पण करण्याची संधी मिळाली आणि तो भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला. पहिल्या सामन्यात त्याला मोठी खेळी करता आली नसली, तरी त्याने आपल्या छोट्या खेळीत २ उत्तुंग षटकार मारत प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले.

वैभव सूर्यवंशी आता पुढील सामन्यात कधी आणि कुठे मैदानात उतरणार?  

भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात वैभव सूर्यवंशीला 15 वर्षे आणि 99 दिवस वय असताना भारताची डेब्यु कॅप मिळाली. या ऐतिहासिक कामगिरीसह त्याने महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा तब्बल 35 वर्षे जुना विक्रम मोडला. सचिनने 16 वर्षे आणि 205 दिवस वय असताना आपले आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते.

पहिल्या सामन्यात वैभवची कामगिरी

या सामन्यात यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनच्या जागी वैभव सूर्यवंशीला प्लेइंग-11 मध्ये स्थान देण्यात आले होते. आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय डावात त्याला मोठी धावसंख्या उभारता आली नाही, तरीही त्याने धाडसी फलंदाजी करत 2 षटकार ठोकले आणि 14 धावा करून तो बाद झाला. आता पुढील सामन्यात या युवा खेळाडूकडून एका मोठ्या खेळीची अपेक्षा असेल.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेतील तिसरा टी-20 सामना 7 जुलै रोजी खेळवला जाईल. हा सामना पाहण्यासाठी क्रिकेट चाहत्यांना रात्री थोडी वाट पाहावी लागेल, कारण सामन्याची वेळ बदलली आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 10:00 वाजता सुरू होणार आहे, सामना आधीच्या सामन्यासारखा संध्याकाळी ७ वाजता सुरू होणार नाही. रात्री 9:30 वाजता दोन्ही कर्णधार टॉससाठी मैदानावर उतरतील.

दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाचा पराभव

मालिकेतील या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून आधी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. टीम इंडियाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 7 गड्यांच्या मोबदल्यात 190 धावांचा मजबूत धावसंख्या उभारली. मात्र, 191 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडच्या संघाने 19 व्या षटकातच 6 गड्यांच्या मोबदल्यात हे लक्ष्य गाठले. इंग्लंडने हा सामना 4 गडी राखून जिंकला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. आता 7 जुलै रोजी होणाऱ्या तिसऱ्या सामन्यात भारतीय संघ पुनरागमन करून मालिका 1-1 अशा बरोबरीत आणण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.

हे ही वाचा -

Pakistan Test Squads Update : शान मसूद OUT, किंग बाबर IN! पाकिस्तान क्रिकेटमध्ये रातोरात मोठा भूकंप; थेट कसोटी टीमचा कर्णधार बदलला, आझमच्या हाती कमान

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IND vs SL Playing XI : वॉर्म-अप मॅचमध्येच झाला गेम! कर्णधार गिल 3 नामांकित खेळाडूंना बेंचवरच सडवणार?, प्लेइंग-11 मधून OUT, एक तर डेब्यूची वाट बघतोय
वॉर्म-अप मॅचमध्येच झाला गेम! कर्णधार गिल 3 नामांकित खेळाडूंना बेंचवरच सडवणार?, प्लेइंग-11 मधून OUT, एक तर डेब्यूची वाट बघतोय
Bhuvneshwar Kumar 2027 World Cup : 2022 मध्ये खेळला शेवटचा वनडे सामना; आता भुवनेश्वर कुमार 2027 वर्ल्ड कप खेळणार?, म्हणाला, मला कॉल आला तर...
2022 मध्ये खेळला शेवटचा वनडे सामना; आता भुवनेश्वर कुमार 2027 वर्ल्ड कप खेळणार?, म्हणाला, मला कॉल आला तर...
Yuzvendra Chahal : 7 सामन्यांत 15 विकेट्स… गंभीर पाहताय ना? ज्याला टीम इंडियातून बाहेर केलं, तोच आता वर्ल्ड कपच्या रेसमध्ये
7 सामन्यांत 15 विकेट्स… गंभीर पाहताय ना? ज्याला टीम इंडियातून बाहेर केलं, तोच आता वर्ल्ड कपच्या रेसमध्ये
IND vs SL Playing XI 1st Test : सरफराज खानची एन्ट्री अन् समीकरणं बदलली! 'हे' 4 खेळाडू बसणार बेंचवर, श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीत अशी असणार टीम इंडियाची खतरनाक Playing 11
सरफराज खानची एन्ट्री अन् समीकरणं बदलली! 'हे' 4 खेळाडू बसणार बेंचवर, श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीत अशी असणार टीम इंडियाची खतरनाक Playing 11
Advertisement

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Embed widget