(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ind vs Eng 2022, 5th Test : इंग्लंडविरुद्ध भारत एकमेव कसोटी सामन्याच्या वेळेत बदल? समोर आली नवी माहिती
England vs India Test Match : 1 जुलै पासून इंग्लंडविरुद्ध भारत सामन्यांना सुरुवात करणार आहे. यावेळी एकमेव कसोटी सामन्यांसह तीन एकदिवसीय आणि तीन टी20 सामनेही खेळवले जाणार आहेत.
ENG vs IND : भारतीय संघ (Team India) येत्या 1 जुलैपासून बलाढ्य इंग्लंडविरुद्ध मैदानात उतरणार आहे. यावेळी मागील दौऱ्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटची आणि एकमेव कसोटी खेळवली जाणार आहे. हा सामना आता निर्धारीत वेळेपेक्षा अर्धा तास आधी म्हणजेचज 3 वाजता सुरु होणार आहे. आधी हा सामना दुपारी 3.30 मिनिटांनी सुरु होणार होता.
डेलीमेलच्या एका रिपोर्टमधून समोर आलेल्या माहितीनुसार भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील एकमेव कसोटी सामना जो 1 जुलै ते 5 जुलै दरम्यान खेळवला जाणार आहे, तो भारतीय वेळनुसार दुपारी 3 वाजता बर्मिंघहम मैदानात सुरु होईल. 2.30 मिनिटांनी नाणेफेक होणार आहे. याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती आली नसली तरी भारतीय चाहत्यांना संपूर्ण मॅच पाहता यावी यासाठी अर्धा तास लवकर खेळाची सुरुवात करुन रात्रीही खेळ लवकर आटोपता यावा, हे यामागील कारण असल्याचं समोर आलं आहे. इतर सामन्यांच्या वेळापत्रकात कोणताही बदल नसून नेमकं वेळापत्रक पाहूया..
इंग्लंड विरुद्ध भारत टी-20 मालिका वेळापत्रक-
सामना | तारीख | ठिकाण |
पहिला टी-20 सामना | 7 जुलै | एजेस बाउल |
दुसरा टी-20 सामना | 9 जुलै | एजबॅस्टन |
तिसरा टी-20 सामना | 10 जुलै | ट्रेंट ब्रिज |
इंग्लंड- भारत एकदिवसीय मालिका वेळापत्रक-
सामना | तारीख | ठिकाण |
पहिला एकदिवसीय सामना | 12 जुलै | ओव्हल |
दुसरा एकदिवसीय सामना | 14 जुलै | लॉर्ड्स |
तिसरा एकदिवसीय सामना | 17 जुलै | मँचेस्टर |
हे देखील वाचा-