IND vs ENG 1st T20 : अभिषेक शर्मा ठरला हिरो! भारताने इंग्लंडचा सात विकेट्सने केला पराभव, मालिकेत घेतली आघाडी
India vs England 1st T20I Updates : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ 2025 मध्ये पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात इंग्लंडविरुद्ध खेळत आहे.

Background
India vs England 1st T20I Cricket Score : टी-20 मालिकेतील पहिल्याच सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने फक्त 132 धावा केल्या, जे टीम इंडियासाठी खूपच कमी होते. अभिषेक शर्माने स्फोटक फलंदाजी करत टीम इंडियाला टी-20 मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. अभिषेक शर्माने फक्त 34 चेंडूत 79 धावा केल्या, ज्यामध्ये त्याने 8 षटकार आणि 5 चौकार मारले. अभिषेक शर्माने फक्त 20 चेंडूत अर्धशतक झळकावले जे त्याच्या भारतातील टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील सर्वात जलद अर्धशतक आहे.
अर्शदीप-चक्रवर्तीही चमकले
अभिषेक शर्माच्या आधी गोलंदाजांनी आपली ताकद दाखवली. विशेषतः अर्शदीप सिंग आणि वरुण चक्रवर्ती यांनी शानदार गोलंदाजी केली. अर्शदीप सिंगने 4 षटकांत फक्त 17 धावा देत 2 विकेट घेतल्या. वरुण चक्रवर्तीने 4 षटकांत 23 धावा देत 3 बळी घेतले. हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेल यांनीही चांगली गोलंदाजी केली आणि प्रत्येकी 2 बळी घेतले. इंग्लंडकडून फक्त जोस बटलरने चांगली कामगिरी केली, त्याने 68 धावा केल्या. तथापि, या कामगिरीचा कोणताही विशेष फायदा झाला नाही कारण इंग्लंडला फक्त 132 धावाच करता आल्या. टीम इंडियाने हा सामना 43 चेंडू आधीच जिंकला, जो चेंडूंच्या बाबतीत इंग्लंडविरुद्धचा सर्वात मोठा विजय आहे.
IND vs ENG 1st T20 : अभिषेक शर्मा ठरला हिरो! भारताने इंग्लंडचा सात विकेट्सने केला पराभव, मालिकेत घेतली आघाडी
सलामीवीर अभिषेक शर्माच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर, भारताने पहिल्या टी-20 सामन्यात इंग्लंडचा सात विकेट्सने पराभव केला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
IND vs ENG 1st T20I Live : टीम इंडियाच्या विजयाकडे वाटचाल
अभिषेक शर्माच्या तुफानी खेळीच्या जोरावर भारतीय संघ विजयाकडे वाटचाल करत आहे. 11 षटकांनंतर भारताची 2 बाद 116 धावा आहेत आणि विजयासाठी 54 चेंडूत आणखी 16 धावांची आवश्यकता आहे.




















