India vs Bangladesh: भारताचा बांगलादेशविरुद्ध दणदणीत विजय; पंत, गिल, अश्विन, जडेजा चमकले, मालिकेत आघाडी
Ind vs Ban News Marathi: आता मालिकेतील दुसरा कसोटी सामना 27 सप्टेंबरपासून कानपूरमध्ये रंगणार आहे.
India vs Bangladesh: भारत आणि बांगलादेश (Ind vs Ban) यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने बाजी मारली आहे. भारतीय संघाने तब्बल 280 धावांनी बांगलादेशचा पराभव केला. या सामन्यात शुभमन गिल, ऋषभ पंत, रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी चमकदार कामगिरी केली. आता मालिकेतील दुसरा कसोटी सामना 27 सप्टेंबरपासून कानपूरमध्ये रंगणार आहे.
चेन्नई येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत (Ind vs Ban) टीम इंडियाने बांगलादेशचा 280 धावांनी पराभव केला आहे. भारताने बांगलादेशला 515 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ 234 धावांत गडगडला. रविचंद्रन अश्विनने भारतासाठी ऐतिहासिक कामगिरी केली. अश्विनने पहिल्या डावात शतक झळकावले आणि दुसऱ्या डावात 6 विकेट्स पटकावल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
Jadeja wraps things up in style! 😎
— BCCI (@BCCI) September 22, 2024
It's all over in Chennai 🙌#TeamIndia | #INDvBAN | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/1ChxakWLfL
दुसऱ्या डावात ऋषभ पंत, शुभमन गिलचा धमाका-
बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात 124 चेंडूत ऋषभ पंतने आपले शतक पूर्ण केले. तर 128 चेंडूत 109 धावा करत ऋषभ पंत (Rishabh Pant) बाद झाला. ऋषभ पंतने शतक झळकवल्यानंतर त्याच्यासह संपूर्ण मैदान भावूक झाल्याचं दिसून आले. मैदानात उपस्थित असणाऱ्या प्रेक्षकांपासून रोहित शर्मा, विराट कोहली आणि ड्रेसिंग रुममधील सर्व खेळाडूंनी उभे राहत ऋषभ पंतचे कौतुक केले. ऋषभ पंतने या खेळीत 13 चौकार आणि 4 षटकार टोलावले. ऋषभ पंत शतक झळकवून बाद झाल्यानंतर शुभमन गिलने देखील शतक केले. शुभमन गिल सध्या 162 चेंडूत 101 धावा केल्यानंतर खेळत आहे. शुभमन गिलने या खेळीत 9 चौकार आणि 3 षटकार लगावले.
THE WINNING CELEBRATION. 🇮🇳
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 22, 2024
Ashwin, Pant and Gill - the centurions at the Chepauk. ❤️🫂pic.twitter.com/2lmfl0kUsf
सामना कसा राहिला?
सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाने 376/10 धावा केल्या. आर अश्विनने संघासाठी सर्वात मोठी खेळी खेळली आणि 133 चेंडूत 11 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 113 धावा केल्या. त्यानंतर पहिल्या डावात फलंदाजीला आलेल्या बांगलादेशला भारतीय गोलंदाजांनी 47.1 षटकांत 149 धावांत गुंडाळले. या काळात जसप्रीत बुमराहने भारताकडून सर्वाधिक 4 बळी घेतले. यानंतर टीम इंडिया दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरली आणि 287/4 धावा करून डाव घोषित केला. यादरम्यान शुभमन गिलने 176 चेंडूत 10 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 119 धावा केल्या. याशिवाय ऋषभ पंतने 128 चेंडूत 13 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 109 धावा केल्या. डाव घोषित केल्यानंतर भारतीय संघाने बांगलादेशला 515 धावांचे लक्ष्य दिले.
संबंधित बातमी:
मैदानातील चाहत्यांपासून रोहित, कोहली, संपूर्ण ड्रेसिंग रुमपर्यंत...; ऋषभ पंतच्या शतकानंतर सर्व भावूक
Rishabh Pant: ऋषभ पंतचे झंझावाती शतक अन् गर्लफ्रेंड ईशाची पोस्ट; तीन शब्दांत सर्व बोलून गेली!