मैदानातील चाहत्यांपासून रोहित, कोहली, संपूर्ण ड्रेसिंग रुमपर्यंत...; ऋषभ पंतच्या शतकानंतर सर्व भावूक
Rishabh Pant: ऋषभ पंतने या खेळीत 13 चौकार आणि 4 षटकार टोलावले.
Ind vs Ban Rishabh Pant: 634 दिवसांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन केल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू ऋषभ पंतने (Rishabh Pant) आज शतक झळकावले. बांगलादेशविरुद्ध सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात ऋषभ पंतने गोलंदाजांना धू धू धुतले.
124 चेंडूत ऋषभ पंतने आपले शतक पूर्ण केले. तर 128 चेंडूत 109 धावा करत ऋषभ पंत (Rishabh Pant) बाद झाला. ऋषभ पंतने शतक झळकवल्यानंतर त्याच्यासह संपूर्ण मैदान भावूक झाल्याचं दिसून आले. मैदानात उपस्थित असणाऱ्या प्रेक्षकांपासून रोहित शर्मा, विराट कोहली आणि ड्रेसिंग रुममधील सर्व खेळाडूंनी उभे राहत ऋषभ पंतचे कौतुक केले.
Rishabh Pant marks his return to Test cricket with a breezy century 💯#WTC25 | 📝 #INDvBAN: https://t.co/rGbNF8A6pX pic.twitter.com/0QhACT03hy
— ICC (@ICC) September 21, 2024
ऋषभ पंतने या खेळीत 13 चौकार आणि 4 षटकार टोलावले. भारतीय संघाच्या दुसऱ्या डावाची धावसंख्या सध्या 4 विकेट्स गमावत 234 झाली आहे. भारतीय संघाने 461 धावांची आघाडी घेतली आहे. आता शुभमन गिल आणि केएल राहुल फलंदाजी करत आहे. ऋषभ पंतने पहिल्या डावात 39 धावा केल्या होत्या. दरम्यान, ऋषभ पंत जेव्हा शतक करण्याच्या जवळ होता. त्यावेळी मैदानात एक मजेशीर किस्सा पाहायला मिळाला. फलंदाजी करत असताना ऋषभ पंतने चक्क बांगलादेशची फिल्डिंग सेट केली. विशेष म्हणजे बांगलादेशचा कर्णधार नजमुल हुसेन शांतोनेही याला सहमती दर्शवली. ऋषभ पंतचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
THE HUNDRED MOMENT OF PANT. 🥶 pic.twitter.com/D6SmBt2vGm
— Johns. (@CricCrazyJohns) September 21, 2024
शुभमन गिलतेही शतक-
ऋषभ पंत शतक झळकवून बाद झाल्यानंतर शुभमन गिलने देखील शतक केले. शुभमन गिल सध्या 162 चेंडूत 101 धावा केल्यानंतर खेळत आहे. शुभमन गिलने या खेळीत 9 चौकार आणि 3 षटकार मारले आहेत. टीम इंडियाची आघाडी 500 धावांच्या जवळ पोहोचली आहे. आतापर्यंत बांगलादेशकडून मेहदी हसन मिराज सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे. मेहदी हसन मिराजला 2 विकेट्स मिळाली. याशिवाय तस्किन अहमद आणि नाहिद राणा यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली.
🚨 12 INTERNATIONAL HUNDREDS FOR GILL 🚨
— Johns. (@CricCrazyJohns) September 21, 2024
- The future of Indian batting...!!!! pic.twitter.com/9xi5mbCo4f
संबंधित बातमी:
बाद नव्हता, तरीही कोहलीने DRS घेतला नाही; मैदान सोडताच रोहित शर्मा अन् अम्पायरच्या रिॲक्शनची चर्चा