IND vs BAN, Playing 11 : अखेर जयदेव उनाडकटला संधी, दुसऱ्या कसोटीत एका बदलासह टीम इंडिया मैदानात, पाहा दोन्ही संघाची अंतिम 11
IND vs BAN : दुसऱ्या कसोटी नाणेफेक गमावल्यामुळे भारताला प्रथम गोलंदाजी करावी लागणार आहे. दरम्यान आज गोलंदाजीत भारताकडे एक अनुभवी गोलंदाज मैदानात दिसणार आहे.
IND vs BAN, 2nd Test: बांगलादेशच्या ढाका येथील शेर ए बांगला स्टेडियमवर भारत आणि बांग्लादेश (India vs Bangladesh) यांच्यात दुसरा कसोटी सामना आजपासून सुरु होत आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात नुकतीच नाणेफेक पार पडली आहे. बांगलादेशने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला आहे. दरम्यान भारतीय संघाच्या (Team India) अंतिम 11 चा विचार करता एक मोठा बदल आज करण्यात आला आहे. मागील बरीच वर्षे प्रतिक्षेत असणाऱ्या जयदेव उनाडकट याने अखेर संघात पुनरागमन केलं असून त्याचा अंतिम 11 मध्ये समावेश झाला आहे. कुलदीप यादवला विश्रांती देत जयदेवला संधी दिली गेली आहे. तर नेमका भारतीय संघ कसा आहे ते पाहूया...
अशी आहे टीम इंडिया?
केएल राहुल (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकिपर), श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, जयदेव उनाडकट, उमेश यादव, मोहम्मद सिराज
View this post on Instagram
बांगलादेश संघाचा विचार करता त्यांचा कर्णधार शाकिब यानेही दोन बदलांसह मैदानात उतरणार असल्याचं यावेळी सांगितलं. मोमिनुल हक हा यासिरच्या जागी संघात सामिल झाला आहे. तर तस्किन अहमद यालाही संधी देण्यात आली असून एबॉदत याच्या जागी खेळत आहेत. तर नेमकी बांगलादेशची अंतिम 11 कशी आहे पाहूया...
बांगलादेशचे अंतिम 11 : नजमुल हुसेन शांतो, झाकीर हसन, मोमिनुल हक, लिटन दास, मुशफिकुर रहीम, शकीब अल हसन (कर्णधार), नुरुल हसन (विकेटकिपर), मेहदी हसन मिराझ, तैजुल इस्लाम, खालेद अहमद, तस्किन अहमद
हे देखील वाचा-