IND vs BAN, Toss Update : नाणेफेकीचा कौल बांग्लादेशच्या बाजूने, प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय
IND vs BAN ODI : भारत आणि बांगलादेश यांच्यात आज पहिला एकदिवसीय सामना रंगणार असून नुकतीच नाणेफेक पार पडली आहे. बांगलादेशने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
IND vs BAN Toss Update : भारत आणि बांग्लादेश (India vs Bangladesh) सामन्याला काही मिनिटांत सुरुवात होत असून नुकतीच नाणेफेक (India vs Bangladesh Toss Update) पार पडली आहे. भारताने नाणेफेक गमावली असून बांगलादेशने गोलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला आहे. याआधीन झालेल्या न्यूझीलंड दौऱ्यातही नाणफेकीचा कौल भारताच्या बाजून लागत नव्हता ज्यानंतर सामने भारताच्या हातातून निसटत होते. आज तरी भारत प्रथम फलंदाजी करत मोठी धावसंख्या उभारणार का हे पाहावे लागेल. त्यात सामना होणाऱ्या ढाका येथील शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियमची खेळपट्टी फिरकीपटूंसाठी मदत देणारी आहे. त्यामुळे भारताचे फिरकीपटू कमाल करणार का हे पाहावे लागेल.
तसंच याठिकाणी फलंदाजानाही मदत मिळू शकते त्यामुळे एक मोठी धावसंख्या भारत उभारेल अशी आशा आहे. पण आऊटफिल्ड स्लो असल्याने शॉट्स खेळताना फलंदाजांना मेहनत घ्यावी लागणार आहे. आजवर चेस करणाऱ्या संघांनी या ठिकाणी 113 पैकी 59 वेळा विजय मिळवला आहे. त्यामुळे भारतासाठी विजय मिळवणं तसं कठीण असणार आहे.
1ST ODI. Bangladesh won the toss and elected to field. https://t.co/XA4dUcD6iy #BANvIND
— BCCI (@BCCI) December 4, 2022
कसा आहे भारतीय संघ?
भारतीय संघाचा (Team India) विचार करता मेडिकल टीमने दिलेल्या माहितीनुसार ऋषभ पंत (Rishabh Pant) एकदिवसीय मालिकेतून बाहेर झाला आहे. तो थेट कसोटी सामन्यांत परतणार आहे. तसंच कुलदीप सेन या युवा खेळाडूला आज संधी मिळाली आहे. विशेष म्हणजे रोहित शर्मा आणि शिखर धवन ही व्हिटेंज जोडी मैदानावर आज परतणार आहे. अंतिम 11 मध्ये विराट, केएल या दिग्गजांसोबत सुंदर, शाहबाज यांचाही समावेश आहे. नेमके दोन्ही संघ कसे आहेत पाहूया...
असे आहेत दोन्ही संघ?
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकिपर), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, मोहम्मद सिराज, कुलदीप सेन
बांगलादेश: लिटन दास (कर्णधार), अनामूल हक, नजमुल हुसेन शांतो, शाकीब अल हसन, मुशफिकुर रहीम (विकेटकिपर), महमुदुल्ला, अफिफ हुसैन, मेहदी हसन मिराज, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, इबादोत हुसैन
हे देखील वाचा-