IND Vs AUS : चौथ्या दिवसाच्या अखेरिस भारताची धावसंख्या 98/2, विजयासाठी अजून 309 धावांची गरज
IND Vs AUS Sydney Test: ऑस्ट्रेलियाच्या 407 या धावसंख्येचा पाठलाग करताना भारताने आपले दोन गडी गमावून 98 धावा केल्या आहेत. भारतीय संघाला विजयासाठी अजून 309 धावांची गरज असून एक दिवसाचा खेळ बाकी आहे.
IND Vs AUS: सिडनी येथे सुरु असलेल्या भारत-ऑस्ट्रेलियाच्या दरम्यानच्या तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवसाचा खेळ संपला असून भारताने दोन विकेट्सच्या बदल्यात 98 धावा केल्या आहेत. भारताला विजयासाठी अजूनही 309 धावांची गरज आहे
चौथ्या दिवसाच्या दुसऱ्या सेशनपर्यंत ऑस्ट्रेलियाने 6 विकेट्सच्या बदल्यात 312 धावा केल्या होत्या आणि 406 धावांची आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाने आपला डाव घोषित केला असून टीम इंडियासमोर विजयासाठी 407 धावांचं आव्हान ठेवलं आहे.
???? STUMPS in Sydney!
Three wonderful sessions for Australia. Can India battle it out on the final day?#AUSvIND SCORECARD ▶️ https://t.co/Zuk24dsH1t pic.twitter.com/8EISzpB62l — ICC (@ICC) January 10, 2021
ऑस्ट्रेलियाच्या या धावसंख्येचा पाठलाग करताना सलामीला आलेल्या रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी डावाची सुरुवात सावधपणे केली. संघाची धावसंख्या 71 असताना हेजलवूडने शुभमन गिलला बाद केले. शुभमन गिलने 64 चेंडूत 31 धावा केल्या. त्यानंतर रोहित शर्माच्या साथीला चेतेश्वर पुजारा मैदानात आला.
रोहित शर्माने आपले अर्धशतक पूर्ण केल्यानंतर कमिन्सच्या एका चेंडूवर षटकार मारायच्या प्रयत्नात त्याने आपली विकेट गमावली. भारतीय संघासाठी हा मोठा धक्का होता. रोहित शर्माने 98 चेंडूत पाच चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 52 धावा केल्या. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर अजिक्य रहाणे मैदानात आला. चौथ्या दिवस संपला तेव्हा पुजारा 9 धावावर तर अजिंक्य रहाणे 4 धावांवर खेळत होते. ऑस्ट्रेलियाच्या हेजलवूड आणि कमिन्सने प्रत्येकी एक विकेट घेतली.
भारताने आपल्या पहिल्या डावात 244 धावा केल्या आहेत. त्याला प्रत्युत्तर देताना चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या संघाने भक्कम धावसंख्या उभारली. कॅमरन ग्रिनने धडाकेबाज खेळी करत 84 धावा केल्या. त्याने कर्णधार टिम पेन (नाबाद 39) सोबत सहाव्या विकेटसाठी 104 धावांची भागिदारी केली. त्यामुळे ऑस्ट्रेलिया भक्कम स्थितीत पोहचली. टीम इंडियाकडून दुसऱ्या डावात नवदीप सैनी आणि अश्विन ने प्रत्येकी विकेट घेतल्या.
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ चार सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरीत आहेत. सिडनी कसोटी जिंकून दोन्ही संघांना बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिकेत आघाडी मिळवण्याची संधी आहे.
संबंधित बातम्या: