Ind vs Aus 5th Test Day-1 : सिडनी खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांची दहशत! पहिल्या दिवशी पडल्या 11 विकेट... जाणून घ्या काय घडलं?
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या चार कसोटी सामन्यांमध्ये जे घडत होते, तेच काहीसे सिडनी कसोटीच्या पहिल्या डावातही पाहायला मिळाले.
IND vs AUS 5th Sydney Test Day-1 : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या चार कसोटी सामन्यांमध्ये जे घडत होते, तेच काहीसे सिडनी कसोटीच्या पहिल्या डावातही पाहायला मिळाले. सिडनी कसोटीच्या पहिल्या डावात टीम इंडिया 185 धावांवर ऑलआऊट झाली. मोठी गोष्ट म्हणजे रोहित शर्माला खराब फॉर्मचे कारण देत संघातून वगळण्यात आले पण तरीही संघाच्या फलंदाजीत सुधारणा झाली नाही. भारताकडून यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतने सर्वात मोठी खेळी खेळली. त्याने 40 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून स्कॉट बोलंडने शानदार गोलंदाजी करत 4 विकेट घेतल्या.
Innings Break!#TeamIndia post 185 in the 1st innings at the Sydney Cricket Ground.
— BCCI (@BCCI) January 3, 2025
Over to our bowlers.
Live - https://t.co/NFmndHLfxu#AUSvIND pic.twitter.com/1585njVwsn
भारताचे दिग्गज फलंदाज ठरले पुन्हा अपयशी
सिडनी कसोटीत टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जो चुकीचा ठरला, स्टार्कने केएल राहुलला लवकर आऊट केले. त्याला केवळ 4 धावा करता आल्या. यानंतर स्कॉट बोलंडने यशस्वी जैस्वालला (10 धावा) आणि कोहलीला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. कोहलीही 17 धावा करून बाद झाला. त्याआधी शुबमन गिल अतिशय खराब शॉट खेळून लंचच्या आधी आऊट झाला. गिलने लायनच्या चेंडूवर पुढे येत शॉट खेळण्याचा प्रयत्न केला पण स्लीपमध्ये तो स्मिथने झेलबाद झाला.
पंत-जडेजाने सांभाळली संघाची धुरा पण
72 धावांत चार विकेट पडल्यानंतर पंत आणि जडेजाने संघाची धुरा सांभाळली. दोघेही बराच वेळ फलंदाजी करत केली. पंतच्या अंगावर अनेक चेंडू लागले आणि तरीही तो क्रीजवरच राहिला पण शेवटी बोलंडच्या चेंडूवर त्याची विकेट पडली. तो 40 धावा करून आऊट झाला. पहिल्याच चेंडूवर नितीश कुमार रेड्डी बाद झाल्याने टीम इंडियाला मोठा धक्का बसला. त्यानंतर स्टार्कने वॉशिंग्टन सुंदर आणि रवींद्र जडेजाला बाद करून टीम इंडियाला आणखी अडचणीत आणले, पण शेवटी जसप्रीत बुमराहने 22 धावांची खेळी करत टीम इंडियाला 185 धावांपर्यंत पोहोचवले.
ऑस्ट्रेलियाला बसला पहिला धक्का
सिडनी कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियानेही एक विकेट गमावली होती. जसप्रीत बुमराहने उस्मान ख्वाजा आऊट केले. ख्वाजाला केवळ 2 धावा करता आल्या. ख्वाजाची विकेट पडल्यानंतर भारतीय खेळाडू खूपच आक्रमक दिसत होते, सिडनीच्या खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियालाही अडचणींचा सामना करावा लागू शकतो, असे दिसते. पहिल्या दिवशी 11 विकेट पडल्या आहे.
हे ही वाचा -