Ind vs Aus 4th Test Day-5 : 13 वर्षांनंतर मेलबर्नमध्ये भारताचा कसोटी पराभव, ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय, मालिकेत घेतली 2-1 अशी आघाडी
Ind vs Aus 4th Test Day-5 Live : मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया चौथी कसोटी खेळली जात आहे.

Background
Australia vs India 4th Test Day-5 Live : मेलबर्न येथे खेळवण्यात आलेला चौथा कसोटी सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला आहे. बॉक्सिंग डे कसोटी कांगारूंनी 184 धावांनी जिंकली. यासह ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. आता भारतासाठी WTC फायनलमध्ये जाणाचा मार्ग कठीण झाला आहे. या कसोटीच्या पाचव्या दिवशी भारताला 340 धावांचे लक्ष्य मिळाले होते. प्रत्युत्तरात टीम इंडिया 155 रन्सवर ऑलआऊट झाली. भारताकडून दुसऱ्या डावात यशस्वी जैस्वालने सर्वाधिक 84 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्स आणि स्कॉट बोलंड यांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. नॅथन लायनलाही दोन यश मिळाले.
ऑस्ट्रेलियाने भारताचा 184 धावांनी केला पराभव
मेलबर्नमधील बॉक्सिंग डे कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारताचा 184 धावांनी पराभव केला आहे. विजयासाठी 340 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा दुसरा डाव 155 धावांवर आटोपला. 13 वर्षांनंतर मेलबर्नमध्ये टीम इंडियाचा हा कसोटी पराभव आहे. यापूर्वी 2011 मध्ये भारतीय संघाचा पराभव झाला होता. या विजयासह ऑस्ट्रेलियाने चार कसोटी सामन्यांनंतर पाच सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. आता पाचवी आणि शेवटची कसोटी 3 जानेवारीपासून सिडनीत खेळवली जाणार आहे.
Ind vs Aus 4th Test Day-5 Live : जैस्वालचं शतक हुकलं! टीम इंडियावर पराभवाचा धोका, शेवटच्या 30 मिनिटांत बदलला गेम
भारताची सातवी विकेट 140 धावांवर पडली. यशस्वी जैस्वाल बाद झाल्याने टीम इंडियाच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. तो 208 चेंडूत 84 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.




















