India vs Afghanistan Semi Final Scenario : चॅम्पियन्स ट्रॉफीमधून तिसरा संघ बाहेर, भारत-अफगाणिस्तान सेमीफायनलमध्ये भिडणार? जाणून घ्या संपूर्ण समीकरण
Champions Trophy 2025 Group B Scenarios : अफगाणिस्तानने पुन्हा एकदा क्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली आहे.

India vs Afghanistan Semi Final Scenario : अफगाणिस्तानने पुन्हा एकदा क्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली आहे. इंग्लंडसारख्या बलाढ्य संघाला हरवून अफगाणिस्तानने मोठा अपसेट निर्माण केला आहे. 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पहिल्या विजयासह अफगाणिस्तानने उपांत्य फेरीच्या शर्यतीत स्वतःला कायम ठेवले आहे, तर इंग्लंड अंतिम चारच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने सलामीवीर इब्राहिम झद्रानच्या 177 धावांच्या मदतीने 50 षटकांत 7 गडी गमावून 325 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल इंग्लंडचा संघ 50 षटकांत 49.5 षटकांत 317 धावांवर सर्वबाद झाला आणि अफगाणिस्तानने 8 धावांनी सामना जिंकला. विक्रमी 177 धावा केल्याबद्दल इब्राहिम झद्रानला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
अफगाणिस्तान संघ पहिल्यांदाच चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी होत आहे, पण त्यांनी त्यांच्या कामगिरीद्वारे दाखवून दिले आहे की, ते या स्पर्धेत फक्त सहभागी होण्यासाठी आलेले नाहीत तर काहीतरी साध्य करण्यासाठी आले आहेत. या विजयासह अफगाणिस्तानच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या आशाही वाढल्या आहेत. जर ते उपांत्य फेरीत पोहोचले तर उपांत्य फेरीत त्यांचा सामना भारताशीही होण्याची शक्यता आहे. जाणून घ्या हे कसे घडू शकते याचे संपूर्ण गणित....
Afghanistan’s stunning win over England sets up a three-way race to the semi-finals in Group B 👊
— ICC (@ICC) February 26, 2025
Here’s how each team can make it to the final 4️⃣https://t.co/OZxK1j44Gw
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील उपांत्य सामन्याचे संपूर्ण समीकरण
भारतीय संघ आधीच उपांत्य फेरीत पोहोचला आहे. आता जर अफगाणिस्तानला उपांत्य फेरी गाठायची असेल तर त्यांच्यासाठी सूत्र अगदी सोपे आहे की, त्यांनी त्यांच्या शेवटच्या साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियाला हरवावे. जर अफगाणिस्तान संघ ऑस्ट्रेलियाला हरवण्यात यशस्वी झाला तर ते 4 गुणांसह उपांत्य फेरीत पोहोचतील. जर दक्षिण आफ्रिकेने त्यांच्या शेवटच्या साखळी सामन्यात इंग्लंडला हरवले तर ते 5 गुणांसह उपांत्य फेरीत पोहोचतील. अशा परिस्थितीत, दक्षिण आफ्रिका गट ब मध्ये पहिल्या स्थानासह आणि अफगाणिस्तान दुसऱ्या स्थानासह उपांत्य फेरीत जाईल.
दुसरीकडे, गट अ मध्ये जर भारताने शेवटच्या साखळी सामन्यात न्यूझीलंडला हरवले. तर ते गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचेल. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये नियम असा आहे की, एका गटातील अव्वल संघ उपांत्य फेरीत दुसऱ्या गटातील दुसऱ्या क्रमांकाच्या संघाशी सामना करेल. जर भारतीय संघ आपल्या गटात अव्वल राहिला आणि अफगाणिस्तान दुसऱ्या क्रमांकावर राहिला, तर भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात एक उपांत्य सामना पाहायला मिळू शकतो.
हे ही वाचा -





















